Chapter 9


1) भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.

उत्तर: योग्य – भारतात पर्वत, समुद्रकिनारे, वाळवंट, जंगल यांसारख्या नैसर्गिक विविधता.

2) पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.

उत्तर: योग्य – पर्यटन ही सेवा असून त्याची थेट वस्तू स्वरूपात देवाणघेवाण होत नाही.


3) मार्गांचा विकास देशाच्या विकासाचा निर्देशांक असतो.

उत्तर: योग्य – वाहतूक सुलभ झाल्यास उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य यांचा विकास होतो.


4)  ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेपेक्षा पुढे आहे.

उत्तर: अयोग्य – ब्राझीलची वेळ भारताच्या वेळेपेक्षा मागे आहे.


5)  भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे.

उत्तर: अयोग्य – भारतात पर्यटनाचा इतिहास प्राचीन काळापासून आहे.

6) ब्राझीलमध्ये पर्यटकांना आकर्षित करणारे घटक कोणते?

उत्तर: समुद्रकिनारे, अॅमेझॉन जंगल, सांस्कृतिक उत्सव, जैवविविधता.


7)  ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गांची अडचण का येते?

उत्तर: घनदाट अरण्य, डोंगराळ भूभाग, कमी लोकवस्ती.


8)  संदेशवहन गतिमान करणारी आधुनिक साधने कोणती?

उत्तर: इंटरनेट, उपग्रह, मोबाईल नेटवर्क, फायबर ऑप्टिक.


9) ठरवण्यासाठी काय वापरले जाते?

उत्तर: ८२°३०’ पूर्व रेखांश (भारतीय प्रमाणवेळेसाठी).


10) वाहतूक मार्गांचा विकास कशासाठी उपयुक्त आहे?

उत्तर: देशाच्या सर्वांगीण विकासासाठी – व्यापार, आरोग्य, शिक्षणासाठी.

11)  ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनास प्रोत्साहन का दिले जाते?

उत्तर: जैवविविधतेचे जतन, पर्यावरणाचे रक्षण, अॅमेझॉन जंगलांचे संवर्धन.


12) ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही, का?

उत्तर: नद्या अडथळ्यांनी भरलेल्या, खडकाळ व जंगल प्रदेशातून वाहतात.


13)  उत्तर भारतात लोहमार्गांचे जाळे का विकसित झाले आहे?

उत्तर: सपाट व सखल भूभाग, दाट लोकवस्ती, कृषी विकास.


14)  वाहतूक मार्गाचा विकास का आवश्यक असतो?

उत्तर: सर्व क्षेत्रांमध्ये संपर्क व मालवाहतूक सुलभ करण्यासाठी.


15)  आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून का राहावे लागते?

उत्तर: मोठ्या प्रमाणातील व स्वस्त वाहतुकीसाठी सागरी मार्ग उपयुक्त असतात.

16)  अॅमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक?

उत्तर: अॅमेझॉन – घनदाट जंगल, कमी विकास; गंगा – सखल भूभाग, अधिक वापर.


17)  भारतातील व ब्राझीलमधील संदेशवहन

उत्तर: भारतात मोबाईल व इंटरनेट जाळे विकसित; ब्राझीलमध्ये काही भागांत मर्यादा.


18) भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ

उत्तर: भारत – GMT +5:30; ब्राझील – GMT -3; भारत वेळेने पुढे.


19)  भारतातील लोहमार्ग व ब्राझीलमधील लोहमार्ग

उत्तर: भारतात सघन जाळे; ब्राझीलमध्ये जंगल व पर्वतरांगा असल्याने मर्यादा.


20)  भारतातील व ब्राझीलमधील रस्ते वाहतूक

उत्तर: भारत – सुवर्ण चतुर्भुज महामार्गासारखी योजना; ब्राझील – ट्रान्स-अॅमेझोनियन मार्ग.

21. आधुनिक संदेशवहन?

उत्तर: इंटरनेट, सोशल मीडिया, उपग्रह, मोबाईल, ई-मेल इत्यादी आधुनिक साधने.


22) प्श्तातील हवाई वाहतूक.

उत्तर: अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशांतर्गत कनेक्टिव्हिटी, क्षेत्रीय उड्डाण योजना.


23)  प्राकृतिक रचना व जलवाहतूक

उत्तर: उतार, खोरे, नदी प्रवाह यावर अंतर्गत जलवाहतूक अवलंबून असते.


24)  प्रमाणवेळेची उपयोगिता

उत्तर: देशभर एकसमान वेळेत कामे होणे शक्य होते; प्रशासकीय समन्वय सुलभ होतो.


25)  ब्लॉदिवोस्टॉकची वेळ ब्राझिलियाच्या तुलनेत किती पुढे आहे?

उत्तर: अंदाजे १३ तासांनी पुढे (GMT +10 वि. GMT -3).

26)  ब्राझील भारतावर अवकाश क्षेत्रात कोणत्या देशांकरिता अवलंबून होता?

उत्तर: सुरुवातीला अमेरिका, अलीकडे भारत, रशिया, चीन व युक्रेन.


27)  प्रमाणवेळ कशाच्या आधारे ठरवली जाते?

उत्तर: विशिष्ट रेखांश (जसे भारतात ८२°३०’ पू. रेखांश) वरून.


28)  भारताच्या वेळेच्या तुलनेत ब्राझीलची वेळ किती मागे आहे?

उत्तर: अंदाजे ८.५ तासांनी मागे.


29) भारतात कोणती पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत?

उत्तर: आग्रा (ताजमहल), केरळ, गोवा, लेह-लडाख, वाराणसी.


30)  विमान ब्राझिलियातून ३१ डिसेंबर रोजी ११ वाजता निघाले, त्यावेळी नवी दिल्ली व ब्लॉदिवोस्टॉकची वेळ काय होती?

उत्तर: नवी दिल्ली – ३१ डिसेंबर, रात्री १०:३०; ब्लॉदिवोस्टॉक – १ जानेवारी, सकाळी १२:००.


Answer by Dimpee Bora