Chapter 1                                         सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय

 1. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय?

उत्तर: वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करणारी शाखा.


2. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय?

 उत्तर: संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तनाचा अभ्यास करणारी शाखा.


3. सूक्ष्म अर्थशास्त्रात मुख्य साधन कोणते आहे?

उत्तर: वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा.


4. स्थूल अर्थशास्त्रात मुख्य साधन कोणते आहे?

उत्तर: समग्र मागणी आणि समग्र पुरवठा.


5. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे?

उत्तर: वैयक्तिक मागणी-पुरवठा, उत्पादन किंमती, उत्पादन घटकांच्या किंमती, उत्पादन व उपभोग, आर्थिक कल्याण.


6. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे?

उत्तर: राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, रोजगार, पैसा व आर्थिक विकास.


7. सूक्ष्म अर्थशास्त्राचा सिद्धान्त कोणता आहे?

उत्तर: किंमत सिद्धान्त.


8. स्थूल अर्थशास्त्राचा सिद्धान्त कोणता आहे?

उत्तर: उत्पन्न व रोजगार सिद्धान्त.


9. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उदाहरणांपैकी एक लिहा.

उत्तर: वैयक्तिक उत्पन्न / वैयक्तिक उत्पादन.


10. स्थूल अर्थशास्त्राच्या उदाहरणांपैकी एक लिहा.

उत्तर: राष्ट्रीय उत्पन्न / राष्ट्रीय उत्पादन.


11. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराच्या कशाचा अभ्यास करते?

उत्तर: सर्वसाधारण रोजगार पातळीचा.


12. आर्थिक चढ-उतारांचे अध्ययन कोण करते?

उत्तर: स्थूल अर्थशास्त्र.


13. किंमत निर्धारण कोणाच्या अभ्यासातून समजते?

उत्तर: सूक्ष्म अर्थशास्त्र.


14. राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी कशासाठी वापरली जाते?

उत्तर: अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन कामगिरीचे मापन करण्यासाठी.


15. लोकांच्या राहणीमानातील फरक समजण्यासाठी कोणते अर्थशास्त्र उपयुक्त ठरते?

उत्तर: स्थूल अर्थशास्त्र.


16. सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र यांच्यातील मुख्य फरक लिहा.

उत्तर: सूक्ष्मात वैयक्तिक घटकांचा अभ्यास होतो (मागणी-पूरवठा, किंमत निर्धारण), तर स्थूलात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होतो (राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, किंमत पातळी).


17. स्थूल अर्थशास्त्र आर्थिक विकास समजण्यास कसे मदत करते?

उत्तर: राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार, किंमत पातळी यांचा अभ्यास करून आर्थिक प्रगतीचे मापन करता येते.


18. सूक्ष्म अर्थशास्त्राचा व्यवसाय निर्णयांमध्ये कसा उपयोग होतो?

उत्तर: उत्पादनाची किंमत, उत्पादन खर्च, मागणी-पूरवठा यांचा अभ्यास करून व्यवसायांना योग्य निर्णय घेता येतात.


19. राष्ट्रीय उत्पन्न व स्थूल अर्थशास्त्र यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.

उत्तर: स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करून संपूर्ण अर्थव्यवस्थेची स्थिती, लोकांचे उत्पन्न आणि विकासाची पातळी समजून घेते.


20. रोजगार पातळीचे महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर: रोजगाराची पातळी समाजातील उत्पन्न, उत्पादन आणि राहणीमान ठरवते. बेरोजगारीमुळे उत्पादन घटते व लोकांचे जीवनमान खालावते.


21. सूक्ष्म अर्थशास्त्रातील ‘आर्थिक कल्याण’ म्हणजे काय?

उत्तर: वैयक्तिक पातळीवर मिळणारा उपभोग, उत्पादन आणि त्यातून मिळणारा समाधान म्हणजे आर्थिक कल्याण.


22. स्थूल आर्थिक चल कोणते आहेत?

उत्तर: एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगाराची पातळी, सामान्य किंमत पातळी.


23. सूक्ष्म अर्थशास्त्रात किंमत कशी ठरते?

उत्तर: मागणी व पुरवठ्याच्या परस्परसंवादातून किंमत ठरते.


24. स्थूल अर्थशास्त्र महागाईचे विश्लेषण कसे करते?

उत्तर: सामान्य किंमत पातळीतील वाढ-घट तपासून, मागणी व पुरवठ्याचे घटक अभ्यासून.


25. राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत उत्पादन का अभ्यासले जाते?

उत्तर: कारण एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीशी केली जाते, ज्यातून आर्थिक प्रगती समजते.


26. सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र यांचे एकत्रित महत्त्व काय आहे?

उत्तर: सूक्ष्म पातळीवरील निर्णय व स्थूल पातळीवरील परिणाम दोन्ही एकत्र आल्यास अर्थव्यवस्थेचे अचूक चित्र मिळते.


27. स्थूल अर्थशास्त्र समाजातील विषमता कशी दाखवते?

उत्तर: लोकांच्या राहणीमानातील फरक, उत्पन्नातील विषमता, रोजगारातील तफावत यांचे विश्लेषण करून.


28. सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचे साधनांमधील फरक लिहा.

उत्तर: सूक्ष्म – वैयक्तिक मागणी व पुरवठा. स्थूल – समग्र मागणी व पुरवठा.


29. सूक्ष्म अर्थशास्त्र कसे उपयुक्त ठरते?

उत्तर: ग्राहकांना वस्तू खरेदीत मदत, उत्पादकांना किंमत व उत्पादन ठरविण्यास मदत, तसेच सरकारला धोरण आखण्यास मदत.


30. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास का आवश्यक आहे?

 उत्तर: कारण त्यातून संपूर्ण अर्थव्यवस्थेची स्थिती समजते – बेरोजगारी, महागाई, आर्थिक चढ-उतार व विकासाचे विश्लेषण करता येते.

  Answer by Dimpee Bora