Chapter 3.b)                                मागणीची लवचिकता      


१) रेषीय मागणी वक्रावरील 'क्ष' अक्षावर किंमत लवचिकता ____ असते.

उत्तर: अनंत


२) रेषीय मागणी वक्रावरील 'य' अक्षावर किंमत लवचिकता ____ असते.

उत्तर: शून्य


३) 'क्ष' अक्षास समांतर मागणी वक्र म्हणजे ____ मागणी.

 उत्तर: संपूर्ण लवचीक


४) 'य' अक्षास समांतर मागणी वक्र म्हणजे ____ मागणी.

उत्तर: संपूर्ण अलवचीक


५) Ed = ० असलेली वस्तू प्रामुख्याने ____ असते.

उत्तर: जीवनावश्यक वस्तू


६) मागणीची लवचिकता उत्पादकासाठी निरुपयोगी असते.

उत्तर: चूक


७) कर धोरण ठरवताना अर्थमंत्री मागणीच्या लवचिकतेचा वापर करतात.

उत्तर: बरोबर


८) अलवचीक मागणी असलेल्या वस्तूंवर कर लावल्यास महसूल कमी होतो.

उत्तर: चूक


९) लवचीक मागणी असलेल्या कामगारांचे वेतन तुलनेने कमी असते.

उत्तर: बरोबर


१०) रेल्वेसारख्या सार्वजनिक सुविधांची मागणी अलवचीक असते.

उत्तर: बरोबर


११) जर मागणी जास्त लवचीक असेल तर उत्पादक किंमत कशी ठेवेल?

उत्तर: कमी


१२) जर मागणी अलवचीक असेल तर उत्पादक किंमत कशी ठेवेल?

उत्तर: जास्त


१३) मक्तेदाराचे मूल्यभेद धोरण कोणावर अवलंबून असते?

उत्तर: मागणीच्या लवचिकतेवर


१४) Ed > 1 म्हणजे मागणी कशी आहे?

उत्तर: लवचीक


१५) Ed < 1 म्हणजे मागणी कशी आहे?

उत्तर: अलवचीक


१६) मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उत्पादकासाठी का महत्त्वाची आहे?

उत्तर: किंमत ठरवण्यासाठी. मागणी लवचीक असल्यास किंमत कमी ठेवतो, अलवचीक असल्यास किंमत वाढवतो.


१७) शासन मागणीची लवचिकता कशासाठी वापरते?

उत्तर: कर लावण्यासाठी योग्य वस्तू निवडण्यासाठी.


१८) अलवचीक वस्तूंवर कर का लावला जातो?

 उत्तर: कारण कर लावल्यावरही मागणी कमी होत नाही आणि महसूल वाढतो.


१९) उत्पादन घटकांच्या मोबदल्याशी मागणीची लवचिकता कशी संबंधित आहे?

उत्तर: अलवचीक मागणी असलेल्या घटकांचे मोबदले जास्त, लवचीक मागणी असलेल्यांचे कमी.


२०) विदेशी व्यापारात मागणीची लवचिकता कशी उपयुक्त ठरते?

उत्तर: आयात-निर्यात धोरण व किमती ठरवण्यासाठी.


२१) सार्वजनिक सुविधांमध्ये मागणीची लवचिकता कशी असते?

उत्तर: रेल्वेसारख्या सुविधा अलवचीक असतात, त्यामुळे सरकार अनुदान देते किंवा राष्ट्रीयीकरण करते.


२२) OPEC ने पेट्रोलियमच्या किमती वारंवार का वाढवल्या?

उत्तर: कारण पेट्रोलियमची मागणी अलवचीक आहे.


२३) अलवचीक मागणी असलेल्या कामगारांचे वेतन कसे असते?

उत्तर: त्यांचे वेतन सहज वाढते.


२४) कर धोरण ठरवताना लवचीक मागणी असलेल्या वस्तूंवर कर का लावला जात नाही?

उत्तर: कारण त्याने मागणी मोठ्या प्रमाणावर घटते.


२५) संपूर्ण लवचीक मागणी म्हणजे काय?

उत्तर: जेव्हा किंमत किंचित वाढली तरी मागणी शून्य होते.


२६) संपूर्ण अलवचीक मागणी म्हणजे काय?

उत्तर: किंमत कितीही वाढली तरी मागणी कायम राहते.


२७) Ed = १ असताना मागणीला काय म्हणतात?

उत्तर: एकक लवचीक मागणी


२८) मागणीची लवचिकता उत्पादकाला कोणते धोरण ठरविण्यास मदत करते?

उत्तर: किंमत धोरण


२९) मागणीची लवचिकता शासनाला कोणते धोरण ठरविण्यास मदत करते?

उत्तर: कर धोरण


३०) मागणीची लवचिकता कामगारांसाठी का महत्त्वपूर्ण आहे?

उत्तर: कारण त्यांच्या उत्पादनाची मागणी अलवचीक असल्यास त्यांचे वेतन जास्त मिळते.

Answer by Dimpee Bora