Chapter 4 विदा विश्लेषण : गुणानुक्रम सहसंबंध
1. कसित राष्ट्रांत शेतीत गुंतलेली लोकसंख्या कशी असते?
उत्तर: कमी
2. विकसनशील राष्ट्रांत शेतीत गुंतलेली लोकसंख्या कशी असते?
उत्तर: जास्त
3.शेतीच्या विकासावर कोणत्या प्रकारचे घटक परिणाम करतात?
उत्तर: प्राकृतिक व मानवी घटक
4.मृदा, हवामान, पाणीपुरवठा हे कोणत्या प्रकारचे घटक आहेत?
उत्तर: प्राकृतिक घटक
5. श्रम, बाजारपेठ, भांडवल हे कोणत्या प्रकारचे घटक आहेत?
उत्तर: मानवी घटक
6. पीकपद्धतीमध्ये बदल का दिसतो?
उत्तर: प्राकृतिक व मानवी घटकांच्या परिणामामुळे
7. आधुनिक शेतीत कोणते साधन वापरले जाते?
उत्तर: ग्रीन हाऊस, पॉली हाऊस
8. उत्पादनवाढीसाठी कोणते वापरले जाते?
उत्तर: संकरित बियाणे, खते, कीटकनाशके
9. पॉली हाऊसचा उपयोग कशासाठी केला जातो?
उत्तर: विशिष्ट प्रदेशातील वनस्पती इतरत्र वाढविण्यासाठी
10. हिमाच्छादित प्रदेशात शेतीसाठी कोणती पद्धत उपयोगी ठरते?
उत्तर: पॉली हाऊस / हरीतगृह पद्धत
11. विकसित राष्ट्रांत लोकसंख्या शेतीत कमी का असते?
उत्तर: कारण तिथे उद्योगधंदे, सेवा क्षेत्र व आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेले असते.
12. विकसनशील राष्ट्रांत लोकसंख्या शेतीत जास्त का गुंतलेली असते?
उत्तर: कारण तेथे औद्योगिकीकरण कमी व शेतीवर अवलंबित्व जास्त असते.
13. शेतीवर हवामानाचा परिणाम कसा होतो?
उत्तर: पिकांची निवड, उत्पादन व पिकांचा कालावधी हवामानावर अवलंबून असतो.
14. शेतीवर पाण्याचा परिणाम कसा होतो?
उत्तर: पाणीपुरवठा कमी-जास्त असल्यास पीकपद्धती ठरते.
15. बाजारपेठेचा शेतीवर कसा परिणाम होतो?
उत्तर: बाजारपेठ उपलब्ध असल्यास शेतकरी नफा मिळवणारी पिके घेतात.
16. भांडवलाचा शेतीवर कसा परिणाम होतो?
उत्तर: भांडवल असल्यास शेतकरी आधुनिक साधने व तंत्रज्ञान वापरू शकतो.
17. सरकारी धोरण शेतीवर कसा परिणाम करते?
उत्तर: अनुदान, कर्ज, कर धोरण यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात फरक पडतो.
18. भूमीचा मालकीहक्क शेतीवर कसा परिणाम करतो?
उत्तर: स्वतःची जमीन असल्यास शेतकरी जास्त काळजी घेतो; भाडेतत्त्वावर असल्यास कमी गुंतवणूक करतो.
19. आधुनिक शेतीत ग्रीनहाऊस पद्धत का वापरतात?
उत्तर: विशिष्ट तापमान व आर्द्रता राखून हवे तसे पीक घेण्यासाठी.
20. उत्पादन वाढवण्यासाठी संकरित बियाण्यांचा वापर का होतो?
उत्तर: कारण त्यातून चांगले व जास्त उत्पादन मिळते.
21. शेतीच्या विकासावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक समजावून सांगा.
उत्तर: मृदा, हवामान, पाणीपुरवठा हे शेतीचे मुख्य प्राकृतिक घटक आहेत. मृदेचा प्रकार पिकांची निवड ठरवतो. हवामानानुसार उष्णकटिबंधीय व शीतकटिबंधीय पिके घेतली जातात. पाणीपुरवठा चांगला असल्यास भात, उस, फळे घेतली जातात; पाणी कमी असल्यास ज्वारी, बाजरी यासारखी पिके घेतली जातात.
22. शेतीच्या विकासावर मानवी घटकांचा कसा परिणाम होतो?
उत्तर: मानवी श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणूक, सरकारी धोरण, लोकसंख्या व भूमीचा मालकी हक्क हे घटक महत्वाचे असतात. या घटकांवर उत्पादनाची मात्रा, पिकांची निवड व शेतीची पद्धत ठरते.
23. ग्रीन हाऊस व पॉली हाऊस पद्धतींचे फायदे समजावून सांगा.
उत्तर: या पद्धतीत तापमान, आर्द्रता व प्रकाश नियंत्रित करता येतो. त्यामुळे पिके लवकर येतात, जास्त उत्पादन मिळते व नाशिवंत पिके सुरक्षित राहतात.
24. विकसनशील राष्ट्रांत शेतीवर अवलंबित्व का जास्त आहे?
उत्तर: कारण औद्योगिक विकास कमी, रोजगाराच्या संधी मर्यादित, व पारंपरिक जीवनशैलीमुळे लोक शेतीवरच उपजीविका करतात.
25. विकसित राष्ट्रांत शेतीत लोकसंख्या कमी असूनही उत्पादन कसे जास्त मिळते?
उत्तर: कारण तिथे आधुनिक यंत्रसामग्री, संशोधन, वैज्ञानिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर होतो.
26. पिकपद्धती म्हणजे काय? तिच्यात बदल का होतो?
उत्तर: एका प्रदेशात कोणते पीक कसे व किती प्रमाणात घेतले जाते ते म्हणजे पिकपद्धती. नैसर्गिक घटक व मानवी गरजा बदलल्यामुळे पिकपद्धतीत बदल होतो.
27. आधुनिक शेतीत संकरित बियाण्यांचा वापर का आवश्यक आहे?
उत्तर: कारण त्यातून रोगप्रतिकारक, अधिक उत्पादनक्षम व बाजारपेठेतील मागणीनुसार पिके घेता येतात.
28. सरकारी धोरणाचा शेतकऱ्याच्या शेतीवर काय परिणाम होतो?
उत्तर: कर्जमाफी, अनुदान, पाणीपुरवठा योजना, करसवलती यामुळे शेतकऱ्याला मदत होते. विपरीत धोरणांमुळे तोटा होतो.
29. हिमाच्छादित प्रदेशात पॉली हाऊस पद्धत कशी उपयुक्त ठरते?
उत्तर: कारण तिथे बाहेर तापमान फारच कमी असते; पॉली हाऊस मध्ये उबदार व नियंत्रित वातावरण निर्माण करून पिके वाढविता येतात.
30. शेतीव्यतिरिक्त प्राथमिक आर्थिक क्रिया कोणत्या असतात?
उत्तर: शिकारी, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, वनीकरण, खाणकाम या मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत.
Answer by Dimpee Bora