Chapter 6 विभाजित आवत आलेख
1. नकाशा हे संदेशवहनाचे साधन आहे का?
उत्तर: होय
2. संदेशवहनासाठी कोणते आधुनिक साधन वापरले जाते?
उत्तर: कृत्रिम उपग्रह
3. भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात २०१८ मध्ये प्राथमिक क्षेत्राचे योगदान किती होते?
उत्तर: १५%
4. भारतात २०१८ मध्ये तृतीयक क्षेत्राचे योगदान किती होते?
उत्तर: ६५%
5. केनियाच्या अर्थव्यवस्थेत प्राथमिक क्षेत्राचे योगदान किती होते?
उत्तर: ३४.२%
6. न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेत तृतीयक क्षेत्राचे योगदान किती होते?
उत्तर: ४२.७%
7. रशियाच्या अर्थव्यवस्थेत दुवितीयक क्षेत्राचे योगदान किती होते?
उत्तर: ३५.२%
8. ताजिकिस्तानमध्ये प्राथमिक क्षेत्राचे योगदान किती होते?
उत्तर: ४१.८%
9. टांझानियामध्ये तृतीयक क्षेत्राचे योगदान किती होते?
उत्तर: ४७.९%
10. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे व्यवस्थापक कोणत्या आर्थिक क्रियेत मोडतात?
उत्तर: पंचक आर्थिक क्रिया
11. नकाशा संदेशवहनाचे साधन का आहे?
उत्तर: कारण नकाशातून स्थान, प्रदेश, वितरण व माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचते.
12. कृत्रिम उपग्रहाचा संदेशवहनासाठी उपयोग कसा होतो?
उत्तर: तो दूरदर्शन, मोबाईल, इंटरनेट व हवामान अंदाज यात माहिती प्रसारित करतो.
13. प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय?
उत्तर: नैसर्गिक साधनांवर अवलंबून असलेले व्यवसाय, जसे शेती, वनीकरण, खनिज उत्खनन.
14. दुवितीयक क्षेत्र म्हणजे काय?
उत्तर: कच्च्या मालाचे रूपांतर करून उत्पादन करणारे उद्योग.
15. तृतीयक क्षेत्र म्हणजे काय?
उत्तर: सेवा क्षेत्र – वाहतूक, व्यापार, बँकिंग, शिक्षण, आरोग्य.
16. भारताच्या अर्थव्यवस्थेत तृतीयक क्षेत्राचे महत्त्व का वाढले आहे?
उत्तर: कारण उद्योग, व्यापार, माहिती तंत्रज्ञान व सेवा क्षेत्र विकसित झाले.
17. चतुर्थक आर्थिक क्रियेत कोणते व्यवसाय येतात?
उत्तर: शिक्षण, संशोधन, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, लेखापाल, कलाकार इ.
18. पंचक आर्थिक क्रियेत कोणते व्यवसाय येतात?
उत्तर: उच्चस्तरीय निर्णय घेणारे व्यवसाय – व्यवस्थापक, न्यायाधीश, वरिष्ठ अधिकारी.
19. चतुर्थक व पंचक व्यवसाय यातील मुख्य फरक काय आहे?
उत्तर: चतुर्थकात संशोधन व कल्पनांचा विकास होतो, तर पंचकात धोरणनिर्धारण व निर्णयप्रक्रिया केली जाते.
20. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (GNI) मध्ये क्षेत्रांचे योगदान का अभ्यासले जाते?
उत्तर: कारण त्यातून देशाची अर्थव्यवस्था कोणत्या क्षेत्रावर अवलंबून आहे हे समजते.
21. भारताच्या अर्थव्यवस्थेतील प्राथमिक, दुवितीयक व तृतीयक क्षेत्रांचे योगदान स्पष्ट करा.
उत्तर: प्राथमिक १५%, दुवितीयक २०%, तृतीयक ६५%. यातून भारत सेवा-प्रधान अर्थव्यवस्था असल्याचे दिसते.
22. रशियाच्या अर्थव्यवस्थेत उद्योगक्षेत्राचे (दुवितीयक) योगदान का जास्त आहे?
उत्तर: कारण रशिया खनिजसंपन्न असून उत्पादन व औद्योगिकीकरण प्रगत आहे.
23. ताजिकिस्तान व केनियाच्या अर्थव्यवस्थेत प्राथमिक क्षेत्राचे योगदान जास्त का आहे?
उत्तर: कारण या देशांत शेती व नैसर्गिक साधनांवर जास्त अवलंबित्व आहे.
24. टांझानिया व बुगांडा यांच्या अर्थव्यवस्थेतील तृतीयक क्षेत्राचे योगदान स्पष्ट करा.
उत्तर: अनुक्रमे ४७.९% व ४७.६%, याचा अर्थ सेवा क्षेत्राची वाढ मोठी आहे.
25. न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेत प्राथमिक क्षेत्राचे योगदान फक्त ७.२% का आहे?
उत्तर: कारण तेथे औद्योगिकीकरण व सेवा क्षेत्र प्रगत आहे.
26. पंचक आर्थिक क्रियांचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर: उच्चस्तरीय धोरणनिर्मिती, व्यवस्थापन, कायदे व प्रशासनिक निर्णय देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.
27. चतुर्थक आर्थिक क्रियांचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर: ज्ञान, संशोधन, शिक्षण व माहिती यामुळे समाज व अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास होतो.
28. कृत्रिम उपग्रहाच्या संदेशवहनामुळे कोणते फायदे झाले आहेत?
उत्तर: दूरसंचार, इंटरनेट, प्रसारमाध्यमे, हवामान अंदाज, जीपीएस सेवा या सर्वात वेग व अचूकता आली.
29. नकाशाच्या माध्यमातून संदेशवहन कसे घडते याचे उदाहरण द्या.
उत्तर: लोकसंख्या वितरण नकाशा, हवामान नकाशा, भूकंप नकाशा – यांतून माहिती लोकांपर्यंत पोचते.
30. प्राथमिक, दुवितीयक व तृतीयक क्षेत्राचा आलेख काढल्यास काय दिसते?
उत्तर: भारतासारख्या देशांत तृतीयक क्षेत्र प्रबळ आहे, तर विकसनशील देशांत प्राथमिक क्षेत्राचे प्रमाण जास्त आहे.
Answer by Dimpee Bora