Chapter 7                         विदा सादरीकरण : लोकसंख्या मनोरा काढणे 


1. भारतातील प्रादेशिक विषमतेस कोणते दोन घटक जबाबदार आहेत?

 उत्तर: भौगोलिक आणि मानवी घटक


2. लोह व पोलाद उद्योगाचे स्थान ठरवताना कोणता निकष महत्त्वाचा असतो?

उत्तर:  कच्च्या मालाची जवळीक


3. ईशान्य भारत आणि हिमाचल प्रदेश कमी विकसित का आहेत?

 उत्तर: कारण वाहतूक, बाजारपेठ व पायाभूत सुविधांचा अभाव आहे.


4. पूर व चक्रीवादळे कोणत्या प्रकारच्या घटकांत मोडतात?

 उत्तर: नैसर्गिक आपत्ती


5. ज्या प्रदेशात बंदरे आणि विमानतळ आहेत, त्या प्रदेशाला कोणता फायदा होतो?

उत्तर: व्यापार व संपर्काची सोय मिळते.


6. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी निधी कोणत्या स्वरूपात दिला जातो?

 उत्तर: अनुदानाच्या स्वरूपात


7. प्रादेशिक विषमता कमी करण्यासाठी कोणते धोरण वापरले जाते?

उत्तर: उद्योगांचे विकेंद्रीकरण


8. आदिवासी प्राबल्य क्षेत्र व दुष्काळग्रस्त क्षेत्रांसाठी काय केले जाते?

उत्तर: विशेष निधी व अनुदानाची तरतूद


9. कुशल कामगार, तंत्रज्ञान आणि बँका यांचा कोणत्या घटकांत समावेश होतो?

उत्तर: मानवी घटक


10. प्रादेशिक असमतोलाचा परिणाम कशावर होतो?

 उत्तर: प्रदेशाच्या विकासावर व राहणीमानावर


11. हिमाचल प्रदेश व उत्तराखंड हे मागास का राहिले आहेत?

 उत्तर: कारण ते डोंगराळ, दुर्गम व वाहतुकीच्या सुविधांपासून दूर आहेत.


12. ज्या प्रदेशांत मूलभूत सोयी आहेत, तेथे खाजगी क्षेत्र का गुंतवणूक करते?

 उत्तर: कारण त्यांना उत्पादन व नफा कमावण्यासाठी योग्य वातावरण मिळते.


13.प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी सुरुवातीस काय केले जाते?

 उत्तर: अविकसित प्रदेश ओळखले जातात.


14. अविकसित प्रदेश शोधण्यासाठी कोणते निकष लावले जातात?

 उत्तर: सामाजिक व आर्थिक निकष


15. उद्योगांचे विकेंद्रीकरण म्हणजे काय?

उत्तर:  उद्योग फक्त एका भागात न राहता विविध प्रदेशात स्थापन करणे


16. नैसर्गिक आपत्ती प्रादेशिक विकासावर कसा परिणाम करतात?

उत्तर:  शेती व औद्योगिक उत्पादन कमी होते, त्यामुळे विकासाचा दर मंदावतो.


17. प्रादेशिक विषमतेची दोन मानवी कारणे सांगा.

 उत्तर: कुशल कामगारांचा अभाव, वाहतुकीचा अभाव


18. प्रादेशिक विषमता कमी करण्यासाठी शासन कोणती पावले उचलते?

उत्तर:  निधीची तरतूद, अनुदान, पायाभूत प्रकल्प, विशेष योजना


19. आदिवासी प्राबल्य क्षेत्रांचा विकास कसा केला जातो?

उत्तर:  आरोग्य, शिक्षण, रस्ते, सिंचन यासाठी विशेष निधी दिला जातो.


20. प्रादेशिक विकासात बाजारपेठेचे महत्त्व स्पष्ट करा.

 उत्तर: बाजारपेठ असल्यास उद्योगांना विक्री सोपी होते, रोजगार मिळतो आणि प्रदेश विकसित होतो.


21. भारतात प्रादेशिक विषमता निर्माण होण्याची भौगोलिक कारणे स्पष्ट करा.

 उत्तर: स्थान, भूउठाव, उंची, संसाधनांची उपलब्धता, हवामान, आपत्ती.


22. भारतात प्रादेशिक विषमता निर्माण होण्याची मानवी कारणे स्पष्ट करा.

उत्तर:  कुशल कामगार, तंत्रज्ञान, वाहतूक, बाजारपेठ, संदेशवहन, बँका व विमा यांचा अभाव.


23. बंदरे व विमानतळ असलेल्या प्रदेशांचा विकास जलद का होतो?

उत्तर:  कारण व्यापार, आयात-निर्यात आणि उद्योग वाढतात.


24. दुष्काळग्रस्त व ओसाड भागात विकास का कमी असतो?

उत्तर:  कारण कृषी उत्पादन कमी आणि उद्योग गुंतवणूक टाळतात.


25. प्रादेशिक विषमता कमी करण्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत?

उत्तर:  रस्ते, शाळा, सिंचन, उद्योग, आरोग्य, विशेष निधी, अनुदान.


26. उद्योग विकेंद्रीकरणाचे फायदे स्पष्ट करा.

 उत्तर: रोजगार वाढतो, प्रादेशिक विकास संतुलित होतो, शहरी भागांवरील ताण कमी होतो.


27. सामाजिक व आर्थिक निकषांच्या आधारे प्रादेशिक विषमता कशी शोधली जाते?

 उत्तर: शिक्षण, आरोग्य, उत्पन्न, पायाभूत सुविधा, रोजगार या निकषांचा अभ्यास करून.


28. प्रादेशिक विकासासाठी पायाभूत सुविधा का महत्त्वाच्या आहेत?

 उत्तर: कारण त्यावर वाहतूक, उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्र उभे राहते.


29. ईशान्य भारत प्रादेशिकदृष्ट्या मागे का राहिला आहे?

 उत्तर: दुर्गम भौगोलिक स्थिती, वाहतूक सुविधा कमी, उद्योग व गुंतवणूक कमी.


30. भारतातील प्रादेशिक विषमता दूर करण्याचे महत्त्व स्पष्ट करा.

 उत्तर: सर्व प्रदेशांचा समान विकास, राहणीमान उंचावणे, रोजगार निर्मिती व राष्ट्रीय ऐक्य टिकवणे.

Answer by Dimpee Bora