Chapter 8                            जागतिक महायुद्ध आणि भारत

१. प्रश्न: इंग्लंडची शक्ती कशामुळे कमी झाली?

उत्तर: दोन महायुद्धांमुळे झालेल्या मोठ्या आर्थिक व मनुष्यहानीमुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली.


२. प्रश्न: भारतीय जनता आणि सैनिकांविषयी ब्रिटिश सत्तेला काय जाणवले?

उत्तर: त्यांच्यावरील ब्रिटिश सत्तेचा दरारा नाहीसा झाला आहे हे जाणवले.


३. प्रश्न: इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय का घेतला?

उत्तर: इंग्लंडची शक्ती कमी झाली व भारतीय जनता-ब्रिटिश सत्ता भीत नाही असे जाणवल्याने.


४. प्रश्न: पहिल्या महायुद्धानंतर कोणती आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली?

उत्तर: राष्ट्रसंघ.


५. प्रश्न: दुसऱ्या महायुद्धानंतर कोणती संघटना स्थापन झाली?

उत्तर: संयुक्त राष्ट्र (UNO).


६. प्रश्न: या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या स्थापनेचे उद्दिष्ट काय होते?

उत्तर: जागतिक शांतता प्रस्थापित करणे.


७. प्रश्न: संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने काय दिले?

उत्तर: भरीव योगदान दिले.


८. प्रश्न: डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म कधी झाला?

उत्तर: १० ऑक्टोबर १९१० रोजी.


९. प्रश्न: डॉ. कोटणीस यांचा जन्म कुठे झाला?

उत्तर: सोलापूर येथे.


१०. प्रश्न: जपानने चीनवर आक्रमण कधी केले?

उत्तर: १९३७ मध्ये.


११. प्रश्न: चीनसाठी भारताकडून किती डॉक्टर पाठवण्यात आले?

उत्तर: पाच डॉक्टर.


१२. प्रश्न: या पाच डॉक्टरांचे नेतृत्व कोणी केले?

उत्तर: डॉ. द्वारकानाथ कोटणीस.


१३. प्रश्न: डॉ. कोटणीस किती वर्षे चीनमध्ये राहिले?

उत्तर: पाच वर्षे.


१४. प्रश्न: डॉ. कोटणीस यांचे निधन कधी झाले?

उत्तर: ९ डिसेंबर १९४२ रोजी.


१५. प्रश्न: डॉ. कोटणीस कशामुळे निधन पावले?

उत्तर: प्लेगच्या साथीत.


१६. प्रश्न: डॉ. कोटणीस यांच्या कार्यामुळे भारत-चीन संबंध कसे झाले?

उत्तर: मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले.


१७. प्रश्न: डॉ. कोटणीस यांच्यावर आधारित चित्रपट कोणी तयार केला?

उत्तर: व्ही. शांताराम यांनी.


१८. प्रश्न: त्या चित्रपटाचे नाव काय होते?

उत्तर: डॉ. कोटणीस की अमर कहानी.


१९. प्रश्न: डॉ. कोटणीस यांचे सोलापूर येथील घर कशासाठी घोषित केले?

उत्तर: स्मारक म्हणून.


२०. प्रश्न: डॉ. कोटणीस स्मारकात काय आहे?

उत्तर: त्यांच्याशी संबंधित गोष्टींचे संग्रहालय.


२१. प्रश्न: सॅम माणकेशा कोणत्या डिव्हिजनमध्ये होते?

उत्तर: १७ इन्फंट्री डिव्हिजन.


२२. प्रश्न: सॅम माणकेशा यांना कुठे पाठवण्यात आले?

उत्तर: म्यानमारमध्ये, जपानी सैन्याचे हल्ले रोखण्यासाठी.


२३. प्रश्न: माणकेशा यांच्यावर हल्ला कुठे झाला?

उत्तर: सितांग ब्रिजवर.


२४. प्रश्न: माणकेशा यांच्यावर किती गोळ्या झाडण्यात आल्या?

उत्तर: नऊ गोळ्या.


२५. प्रश्न: माणकेशा यांच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन कोणी केले?

उत्तर: त्यांचे वरिष्ठ कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल डी.टी. कोवान यांनी.


২৬. प्रश्न: मेजर जनरल कोवान यांनी माणकेशांना काय दिले?

उत्तर: स्वतःचे मिलिटरी क्रॉस पदक.


२७. प्रश्न: मिलिटरी क्रॉस कोणाला दिले जाते?

उत्तर: फक्त जिवंत सैनिकांना.


२८. प्रश्न: माणकेशा यांना पुढे कुठे नेण्यात आले?

उत्तर: दवाखान्यात.


२९. प्रश्न: स्वतंत्र भारतात सॅम माणकेशा कोण बनले?

उत्तर: पहिले फील्ड मार्शल.


३०. प्रश्न: या उताऱ्यातील मुख्य व्यक्तिमत्त्व कोणती?

उत्तर: डॉ. द्वारकानाथ कोटणीस आणि सॅम माणकेशा.

Answer by Dimpee Bora