Chapter 4                       वसाहतवाद आणि मराठे.                            


१. पंजाब जिंकणारा पहिला आक्रमक कोण होता?

उत्तर: अहमदशहा अब्दाली.


२. दत्ताजी शिंदे यांना कोणत्या लढाईत वीरमरण आले?

उत्तर: पंजाबातील लढाईत.


३. दिल्लीवर अंमल बसवणारा शासक कोण?

उत्तर: अहमदशहा अब्दाली.


४. अफगाणांना भारतातून कायमचे घालवण्यासाठी मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले?

उत्तर: सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव पेशवे.


५. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या दिवशी झाली?

उत्तर: १४ जानेवारी १७६१.


६. पानिपतचे तिसरे युद्ध कोठे झाले?

उत्तर: यमुना नदीच्या तीरावर, पानिपत येथे.


७. पानिपतच्या युद्धात कोणत्या मराठा नेत्यांचा मृत्यू झाला?

उत्तर: सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव पेशवे.


८. "दोन मोत्ये गळाली, २७ मोहरा गमावल्या…" हा संदेश कुठे पोहोचला?

 उत्तर: पुण्यास.


९. पानिपतच्या युद्धानंतर अब्दाली किती महिन्यांत अफगाणिस्तानला परतला?

उत्तर:  दोन महिन्यांत.


१०. अब्दालीच्या वारसदारांनी भारतावर परत आक्रमण का केले नाही?

उत्तर: मराठ्यांच्या कडव्या प्रतिकाराची जाणीव झाल्यामुळे.


११. मराठ्यांनी कोणत्या व्यापक भूमिकेने पानिपतवर लढाई लढली?

उत्तर: "भारतीयांसाठी भारत" या भूमिकेने.


१२. एकोणिसाव्या शतकापर्यंत भारतात कोणांचे वर्चस्व प्रस्थापित झाले?

 उत्तर: इंग्रजांचे.


१३. इंग्रजांच्या वर्चस्वाविरुद्ध भारतीयांनी काय केले?

 उत्तर: लढा दिला.


१४. इंग्रजांच्या वर्चस्वाविरुद्ध लढण्याबरोबर भारतीय समाजाला आणखी कोणत्या गोष्टींशी लढा द्यावा लागला?

 उत्तर: अनिष्ट चालीरीती आणि रूढी-रिवाज.


१५. पुढील पाठात कोणत्या सुधारणांची माहिती मिळणार आहे?

 उत्तर: भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा.


१६. मराठ्यांनी पोर्तुगिजांना कुठल्या वेढ्यात पराभूत केले?

उत्तर: फोंड्याच्या वेढ्यात.


१७. शिवाजी महाराज आणि इंग्रजांचा संबंध सर्वप्रथम कुठल्या प्रकरणात आला?

 उत्तर: कुडाळ स्वारीच्या प्रकरणात.


१८. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे कोणांचा पराभव केला?

 उत्तर: पोर्तुगीजांचा.


१९. पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले?

उत्तर:  मराठे आणि अब्दाली.


२०. कास्मो-द-ग्वार्द कोण होते?

उत्तर: पोर्तुगीज इतिहासकार.


२१. गोंसालू मातीस कोण होते?

उत्तर: पोर्तुगीज वकील.


२२. फ्रांस्वाँ मार्टिन कोण होते?

उत्तर: फ्रेंच वखारीचे प्रमुख.


२३. हेन्री रेव्हिंग्टन कोण होते?

उत्तर: इंग्रज अधिकारी.


२४. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय कोण?

उत्तर: पोर्तुगीज.


२५. पोर्तुगिजांचा दारूगोळा असलेले ठिकाण कोणते?

उत्तर: चौल.


२६. वखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजराणा देणारे कोण?

उत्तर: इंग्रज.


२७. जैतापूरचा इंग्रज दलाल कोण?

उत्तर: फ्रांसिस डे.


२८. शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर जकाती का उभारल्या?

उत्तर: इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी.


२९. शिवाजी महाराजांनी आरमार का उभारले?

उत्तर: सागरी किनारे व व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी.


३०. मराठ्यांचे धोरण वसाहतवादविरोधी का मानले जाते?

उत्तर:  कारण त्यांनी पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच या सर्व वसाहतवाद्यांना विरोध केला.

Answer by Dimpee Bora