Chapter 4                 समकालीन भारत: शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने                         

Q1. अमेरिकन समाजासाठी सुरुवातीला कोणती संकल्पना वापरली जात होती?

Ans. Melting Pot ही संकल्पना वापरली जात होती.


Q2. Melting Pot या संकल्पनेचा मूळ अर्थ काय आहे?

Ans. सर्व संस्कृती एकत्र मिसळून एक नवीन अमेरिकी संस्कृती तयार होते.


Q3. Salad Bowl संकल्पनेचा अर्थ काय आहे?

Ans. विविध संस्कृती वेगळ्या ओळखीने टिकून राहतात पण एकत्र येऊन समाजाला वैविध्याची चव देतात.


Q4. Melting Pot मध्ये व्यक्तींची मूळ सांस्कृतिक ओळख काय होते?

Ans. ती विरघळून एकसंध अमेरिकी संस्कृती तयार होते.


Q5. Salad Bowl मध्ये संस्कृतींमध्ये काय टिकून राहते?

Ans. स्वतःची वेगळी ओळख टिकून राहते.


Q6. भारताला Melting Pot पेक्षा कोणत्या संकल्पनेशी जोडता येते?

Ans. Salad Bowl संकल्पनेशी.


Q7. भारताचे वर्णन Salad Bowl प्रमाणे का करता येते?

Ans. कारण येथे विविध धर्म, भाषा, प्रादेशिक संस्कृती आपली ओळख राखून एकत्र राहतात.


Q8. भारताची ओळख कोणत्या वाक्याने स्पष्ट करता येते?

Ans. विविधतेतील एकता.


Q9. भारतात स्वातंत्र्य कोणत्या वर्षी मिळाले?

Ans. 1947 साली.


Q10. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर कोणती मोठी समस्या होती?

Ans. आर्थिक मागासलेपण.


Q11. राष्ट्रीय एकात्मतेचे पहिले समान मूल्य कोणते?

Ans. समान नागरिकत्व.


Q12. राष्ट्रीय एकात्मतेमध्ये विविधतेतील एकता याचा काय अर्थ?

Ans. भिन्न धर्म, भाषा व परंपरा असूनही एकत्र राहणे.


Q13. राष्ट्राप्रती कोणती भावना असावी?

Ans. निष्ठा.


Q14. भिन्न समुदायांबद्दल काय असावे?

Ans. बंधुत्वाची भावना.


Q15. राष्ट्रीय एकात्मतेसाठी कोणता तत्व महत्वाचा आहे?

Ans. धर्मनिरपेक्षता.


Q16. सामाजिक-आर्थिक आणि राजकीय न्याय कोणत्या उद्देशासाठी आवश्यक आहे?

Ans. समानतेसाठी आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी.


Q17. राष्ट्रीय एकात्मतेत समानता म्हणजे काय?

Ans. सर्व नागरिकांना समान हक्क व संधी मिळणे.


Q18. राष्ट्रीय एकात्मतेमध्ये राज्याची पहिली भूमिका कोणती आहे?

Ans. सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणणे.


Q19. राज्य लहान प्रदेश किंवा गटांवर काय प्रस्थापित करते?

Ans. एक राष्ट्रीय सत्ता.


Q20. राज्य व जनतेमध्ये काय घडवून आणले पाहिजे?

Ans. सुसंवाद.


Q21. सामाजिक सुव्यवस्था टिकवण्यासाठी राज्य काय करते?

Ans. काही उद्दिष्टे व मूल्ये विकसित करते.


Q22. राज्याची आणखी एक महत्त्वाची भूमिका कोणती आहे?

Ans. आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन देणे.


Q23. नागरिकांचे रक्षण राज्य कशापासून करते?

Ans. अंतर्गत आणि परकीय आक्रमणांपासून.


Q24. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय?

Ans. भिन्नतेचा सन्मान करत नागरिकांमध्ये एकतेची भावना निर्माण होणे.


Q25. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकजिनसीपणा का नाही?

Ans. कारण ती विविधतेला नाकारत नाही तर सन्मान करते.


Q26. राष्ट्रीय एकात्मता कशाला समर्थन करते?

Ans. समुदायांच्या समुदायाला (community of communities).


Q27. राष्ट्रीय एकात्मता कशाचा आदर करते?

Ans. मूल्ये, अनुभव आणि भौगोलिक सहसंबंध.


Q28. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एक प्रकारची कोणती सहिष्णुता आहे?

Ans. वांशिक, भाषिक आणि धार्मिक सहिष्णुता.


Q29. समाजातील शांततेसाठी राष्ट्रीय एकात्मता का आवश्यक आहे?

Ans. कारण ती सुसंवाद व सहजीवन वाढवते.


Q30. राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक स्थैर्य राष्ट्राला कशासाठी मदत करतात?

Ans. राष्ट्रउभारणीसाठी.

Answer by Dimpee Bora