Chapter 3                       १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न                                    

1. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली?

उत्तर: 1992 साली.


2. राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्य कार्य काय आहे?

 उत्तर: महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करणे.


3. ७३वी व ७४वी घटनादुरुस्ती कधी लागू झाली?

 उत्तर: 1993 साली.


4. ७३वी व ७४वी घटनादुरुस्तीमुळे महिलांना काय मिळाले?

उत्तर:  पंचायत समिती व नगरपालिकांमध्ये आरक्षण.


5. स्थानिक स्वराज्यात महिलांच्या आरक्षणामुळे काय झाले?

 उत्तर: महिलांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढला.


6. महिलांच्या जीवनात मोठे बदल का झाले?

 उत्तर: औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, शहरीकरण व आधुनिकीकरणामुळे.


7. महिलांना उदारमतवादामुळे काय संधी मिळाल्या?

उत्तर:  शिक्षण, रोजगार व निर्णयप्रक्रियेत सहभाग.


8. महिलांसमोर कोणत्या समस्या अजूनही आहेत?

उत्तर: अत्याचार, वेतनातील दरी व भेदभाव.


9. संस्थात्मक घटक कोणते आहेत?

उत्तर: कुटुंब, समुदाय, धर्म व शैक्षणिक संस्था.


10. लिंगभाव समानतेसाठी काय आवश्यक आहे?

उत्तर: आर्थिक व सामाजिक धोरणांची निर्मिती व अंमलबजावणी.


11. महिला व बालकल्याण मंत्रालय स्वतंत्र कधी झाले?

उत्तर: 2006 साली.


12. महिला व बालकल्याण मंत्रालय याआधी कुठल्या विभागाअंतर्गत होते?

उत्तर: मानव संसाधन विकास विभाग.


13. या मंत्रालयाचा प्रमुख उद्देश काय आहे?

उत्तर: महिलांना सन्मानाने जगता यावे व बालकांसाठी कायदे, धोरणे आखणे.


14. महिला व बालकल्याण मंत्रालयाचे ध्येय काय आहे?

 उत्तर: महिलांचे सक्षमीकरण व हिंसा व भेदभावरहित वातावरण तयार करणे.


15. महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण कधी तयार झाले?

उत्तर: 2001 साली.


16. राष्ट्रीय महिला धोरणाचा मसुदा कधी तयार करण्यात आला?

उत्तर: 2016 मध्ये.


17. कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ प्रतिबंध कायदा कधी झाला?

उत्तर: 2013 मध्ये.


18. घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा कधी झाला?

उत्तर: 2005 मध्ये.


19. मुस्लीम महिला (तलाक संदर्भात हक्क संरक्षण) कायदा कधी झाला?

उत्तर: 2019 मध्ये.


20. राष्ट्रीय महिला धोरण 2016 चे एक उद्दिष्ट सांगा.

उत्तर: महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार व राजकारणात समान संधी मिळवून देणे.


21. ७३वी व ७४वी घटनादुरुस्तीमुळे महिलांचा सहभाग कसा वाढला?

उत्तर: या दुरुस्त्यांमुळे पंचायत समित्या व नगरपालिकांमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळाले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णयप्रक्रियेत महिलांचा थेट व प्रभावी सहभाग वाढला.


22. महिलांना कोणत्या संधी व कोणते आव्हाने आहेत?

उत्तर: संधी: शिक्षण, रोजगार, निर्णयप्रक्रियेत सहभाग.

आव्हाने: अत्याचार, वेतनातील दरी, भेदभाव.


23. संस्थात्मक घटकांचा महिलांच्या सक्षमीकरणात काय सहभाग आहे?

उत्तर: कुटुंब, समुदाय, धर्म व शैक्षणिक संस्था योग्य मूल्ये व मानसिकता निर्माण करून लिंगभाव समानतेसाठी योगदान देऊ शकतात.


24. महिला व बालकल्याण मंत्रालयाची स्थापना का महत्त्वाची आहे?

उत्तर: कारण ते महिलांच्या समस्या ओळखून कायदे, धोरणे व कार्यक्रम आखते आणि त्यांची अंमलबजावणी करते.


25. राष्ट्रीय महिला धोरण 2001 व 2016 मध्ये काय फरक आहे?

उत्तर: 2001 चे धोरण हे मूलभूत होते; 2016 च्या मसुद्यात बदलत्या परिस्थितीनुसार महिलांच्या सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन व समान संधींवर अधिक भर देण्यात आला.


26. महिला सक्षमीकरणासाठी पारित झालेल्या तीन महत्त्वाच्या कायद्यांची नावे सांगा.

उत्तर: (1) घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा, 2005

(2) लैंगिक छळ प्रतिबंध कायदा, 2013

(3) मुस्लीम महिला हक्क संरक्षण कायदा, 2019


27. भारतामध्ये महिला सक्षमीकरण का आवश्यक आहे?

उत्तर: कारण महिलांशिवाय समाजाचा विकास अपूर्ण आहे, त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार व सुरक्षित वातावरण मिळाले तरच समाज व देशाचा सर्वांगीण विकास होईल.


28. महिला आयोग व मंत्रालय यात फरक काय आहे?

 उत्तर: महिला आयोग हे तक्रारींचे निराकरण व सल्ला देणारी संस्था आहे, तर मंत्रालय धोरणे, कायदे व कार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करते.


29. महिला सक्षमीकरणाचे सामाजिक महत्त्व काय आहे?

उत्तर: लिंगभाव समानता निर्माण होते, समाजात न्याय टिकतो, कुटुंब व समाज अधिक प्रगत होतो.


30. महिला सक्षमीकरणासाठी समाजात कोणते बदल आवश्यक आहेत?

उत्तर: मानसिकता बदल, शिक्षणाचा प्रसार, कायद्यांचे काटेकोर पालन व महिलांना सुरक्षित वातावरण देणे.

Answer by Dimpee Bora