Chapter 1 काहीतरी आहे, पण काय आहे?
प्र.१ वस्तूंचा अनुभव वस्तूचे रूप, रंग, आकार, प्रकार इ. स्वरूपाचा असतो. (भौतिक/काल्पनिक/तात्त्विक)
उत्तर : भौतिक
प्र.२ अस्तित्वात असणाऱ्या सर्व गोष्टींचे वर्गीकरण दर्शनाने जीव-अजीव वा प्रकारात केले. (सांख्य/जैन/न्याय)
उत्तर : जैन
प्र.३ ज्ञान मिळवण्यासाठी साधने आणि प्रयोग अनिवार्य ठरले. (व्यक्तिनिष्ठ/आंतरव्यक्तिनिष्ठ/वस्तुनिष्ठ)
उत्तर : वस्तुनिष्ठ
प्र.४ प्लेटोच्या मते, दृश्य जगाचे अस्तित्व जगावर अवलंबून असते. (आकारांच्या/प्रतिबिंबांच्या/भौतिक वस्तूंच्या)
उत्तर : आकारांच्या
प्र.५ देकार्तच्या मते, विश्वात जडद्रव्य आणि चेतनद्रव्य अशी दोन स्वतंत्र द्रव्ये आहेत. (परस्परविरोधी/परस्परावलंबी/परस्परसंबंधी)
उत्तर : परस्परविरोधी
प्र.६ "भौतिकद्रव्य" याला इंग्रजीत काय म्हणतात?
उत्तर : Material substance
प्र.७ "चेतनद्रव्य / चैतन्य" याचा इंग्रजी अर्थ काय?
उत्तर : Consciousness
प्र.८ "शाश्वत" शब्दाचा अर्थ काय?
उत्तर : Eternal
प्र.९ "अविनाशी" याचा अर्थ काय?
उत्तर : Indestructible
प्र.१० "आकर्षण" व "विकर्षण" यांचा संबंध कोणत्या तत्त्वांशी आहे?
उत्तर : भौतिकशास्त्रातील शक्तींसोबत
प्र.११ थेलिस, अनॉक्झिमिनस, हेराक्लिटस, देकार्त – वेगळा कोण?
उत्तर : देकार्त (तो आधुनिक तत्त्वज्ञ आहे)
प्र.१२ जडवाद, वास्तववाद, असत्कार्यवाद, चिद्वाद – वेगळा कोण?
उत्तर : चिद्वाद (तो आत्मा/चेतनेवर आधारित आहे)
प्र.१३ लाईब्निझ हा एकतत्त्ववादी होता. (सत्य/असत्य)
उत्तर : सत्य
प्र.१४ पारमेनिडिसच्या मते सत् परिवर्तनशील आहे. (सत्य/असत्य)
उत्तर : असत्य
प्र.१५ चार्वाक जडवादाचे पुरस्कर्ते आहेत. (सत्य/असत्य)
उत्तर : सत्य
प्र.१६ शंकराचार्य प्रातिभासिक सत्ला अंतिम सत् मानतात. (सत्य/असत्य)
उत्तर : असत्य
प्र.१७ विज्ञानाच्या नैतिक पैलूंची चर्चा कोण करावी?
उत्तर : वैज्ञानिक आणि समाज
प्र.१८ विज्ञानाची वाटचाल सर्वांसाठी हितकारक कशामुळे ठरते?
उत्तर : विज्ञानाच्या नैतिक पैलूंची चर्चा झाल्यामुळे
प्र.१९ योग्य काय आहे हे शोधण्याची प्रक्रिया कशामुळे पुढे सरकते?
उत्तर : वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे
प्र.२० वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात अधिक चांगल्या प्रकारे कसा स्वीकारला जाईल?
उत्तर : जेव्हा विज्ञानातील चर्चा सर्वसामान्यांना माहीत असेल तेव्हा
प्र.२१ शंकराचार्यांनी सांगितलेल्या सत् चे तीन प्रकार कोणते?
उत्तर : प्रातिभासिक, व्यवहारिक आणि पारमार्थिक
प्र.२२ प्रातिभासिक सत् चे उदाहरण द्या.
उत्तर : स्वप्नातील अनुभव, मृगजळातील पाणी
प्र.२३ व्यवहारिक सत् म्हणजे काय?
उत्तर : व्यवहारात जाणवणारे सत्य (उदा. खुर्ची, टेबल)
प्र.२४ पारमार्थिक सत् म्हणजे काय?
उत्तर : शाश्वत ब्रह्म, अंतिम सत्य
प्र.२५ अणुवाद म्हणजे काय?
उत्तर : सर्व वस्तू अणूंनी बनलेल्या आहेत ही धारणा
प्र.২৬ "स्वयंभू" या शब्दाचा अर्थ काय?
उत्तर : स्वतःहून अस्तित्वात असलेले
प्र.२७ दर्शनशास्त्रात "अभाव" म्हणजे काय?
उत्तर : गोष्टीचे अस्तित्व नसणे, Non-existence
प्र.२८ विज्ञानाच्या प्रगतीत नैतिक चर्चेचे महत्त्व का आहे?
उत्तर : कारण ती प्रगती सर्वांसाठी हितकारक व्हावी
प्र.२९ "सामान्य" (Generality) हा शब्द तत्त्वज्ञानात कशासाठी वापरला जातो?
उत्तर : सर्व वस्तूंना लागू होणारे वैशिष्ट्य दाखवण्यासाठी
प्र.३० विज्ञानसमुदायाबाहेरील लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन का स्वीकारावा?
उत्तर : कारण समाजाची वाटचाल अधिक प्रगत आणि समतोल होण्यासाठी
Answer by Dimpee Bora