Chapter-8                     धाडसी कंप्टन: राधिका मेनन


प्रश्न 1.

चौकटी पूर्ण करा.

(अ) राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव.
उत्तर:
कोदुनगर

(आ) पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स .
उत्तर:
रेडिओ कोर्स

(इ) मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज → □
उत्तर:
संपूर्ण स्वराज्य

(ई) राधिका यांच्या पतीचा पेशा → □
उत्तर:
नेव्हीमधील एक रेडिओ ऑफिसर

प्रश्न 2.

कारणे लिहा

(अ) राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला जावंसं वाटायचं; कारण…
उत्तर:
‘त्यांच मोकळ्या वेळेत नेहमी सागरकिनारी भटकणं, फिरणं व्हायचं. उसळणाऱ्या नखरेल लाटा नेहमी त्यांना आकर्षित करत असत.

(आ) त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता; कारण…
उत्तर:
त्यांना वाटत होतं, की ही जोखमीची नोकरी आहे आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना करू शकणार नाही.

(इ) बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छिमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले; कारण…
उत्तर:
वादळाचा जोर प्रचंड मोठा होता. समुद्रीलाटांनी रौद्र रूप धारण केले होते आणि मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता. त्यावेळी ९ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या व वारा ७० समुद्री मैल वेगाने वाहत होता.

प्रश्न  3.
स्वमत लिहा.

(अ) कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छिमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
२२ जून २०१५ रोजी समुद्रात मोठे वादळ आले होते. या वादळात सात मच्छिमारांची एक नाव लाटांच्या गर्तेत सापडली होती. वादळाने भयानक रूप घेतले होते. त्याच वेळी जवळच असलेल्या कॅप्टन राधिका यांच्या जहाजावर या संकटाचा संदेश आला. कॅप्टन राधिका व त्यांच्या टीमने एका क्षणाचाही विलंब न करता बचावकार्यास प्रारंभ केला. वादळाचा जोर जास्त असल्याने त्यांना नावेपर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते. लाटांनी रौद्र रूप धारण केले होते. आपल्या मदतीसाठी जहाज जवळ. येण्याचा प्रयत्न करत आहे हे मच्छिमारांना कळले होते. जगण्यासाठी प्रत्येक जण जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होता; मात्र वादळाच्या तीव्र प्रवाहामुळे जहाजातील कर्मचाऱ्यांचे पहिले दोन प्रयत्न फसले. सगळ्यांना वाटले, की आता सर्व काही संपले आहे; मात्र राधिका यांनी आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही. त्यांनी परिस्थितीसमोर हार न पत्करता आपल्या टीमला तिसऱ्यांदा पुढे जाण्याचा आदेश दिला. लाटा, वारा यांचे थैमान सुरूच होते; पण संपूर्ण टीमने हिंमत न हारता प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना यशही मिळाले. पायलट शिडीद्वारे सातही मच्छिमारांना सहीसलामत जहाजात घेण्यात आले. अशाप्रकारे, जीवाची बाजी लावून कॅप्टन राधिकांच्या टीमने मच्छिमारांना वाचवले.


(आ) धाडस आणि हिंमत असली, की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पादाधारे स्पष्ट करा.
उत्तर:
जीवनात मोठमोठी संकटे आली तरीही धाडसाने त्यांना सामोरे जाण्याची हिंमत अंगी असेल, तर त्या संकटांवर सहज मात करता येते. आपण प्रत्येक जण वेगवेगळी स्वप्नं पाहतो; मात्र ती पूर्ण करणे सर्वांनाच शक्य होत नाही. ज्या व्यक्तींमध्ये काहीतरी करण्याची हिंमत असते त्याच व्यक्ती त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे राधिका मेनन होय. समुद्रावरील प्रेमापोटी तिने मर्चंट नेव्हीमध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले; मात्र एक नाजूक मुलगी जोखमीची नोकरी कशी सांभाळू शकेल अशा भीतीने आईवडिलांनी तिला विरोध केला; पण प्रचंड हिंमत असलेली, धाडसाने भरलेली राधिका डगमगली नाही.तिने आपल्या आईवडिलांना त्यासाठी राजी केले. एवढ्यावरच न थांबता तिने पदवी मिळवल्यानंतर रेडिओ कोर्स पूर्ण केला. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ मध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळवली आणि समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न तिने हिमतीने पूर्ण केले.
एवढ्यावरच न थांबता तिने प्रयत्न सुरू ठेवले आणि समुद्री जहाजाची कमान सांभाळण्याचे स्वप्नही तिने प्रत्यक्षात आणले. आपल्या कौटुंबिक आणि नोकरीच्या जबाबदाऱ्या मोठ्या हिमतीने तिने पार पाडल्या. आपल्या घरापासून, मुलापासून दीर्घकाळ लांब राहण्याच्या परिस्थितीला ती धाडसाने सामोरी गेली.आपल्या हिमतीच्या बळावर सात मच्छिमारांचा भर वादळात जीव वाचवून तिने ‘ॲवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी’ हा पुरस्कार मिळवणारी पहिली महिला अधिकारी असण्याचा मान मिळवला. अशाप्रकारे, धाडस आणि हिमतीच्या बळावर तिने अशक्य वाटणारे स्वप्न पूर्ण करून दाखवले.

 
(इ) मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते आणि का, थोडक्यात लिहा.
उत्तर:
मोठेपणी मला शिक्षक व्हावे असे वाटते. शिक्षकी पेशा असा आहे, की जेथे ज्ञानदानाचे पवित्र काम होते. या पेशात व्यक्ती शिकवता शिकवता स्वत: ही शिकत असते. हा पेशा व्यक्तीस अधिक प्रगल्भ, अधिक ज्ञानी, अधिक संवेदनशील बनवतो. माझी आई शिक्षिका आहे.

तिचा या पेशाबाबतचा ओढा, तिचे समर्पण, तिचे विदयार्थ्यांमध्ये मिसळणे, त्यांना समजून घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी झटणे या गोष्टी मला लहानपणापासून आकर्षित करतात. या पेशात कधीही तोचतोचपणा नसतो. दरदिवस नवे अनुभव घेऊन येतो. शिक्षक हा अनेक पिढ्यांना आकार देणारा मूर्तिकार असतो असे मला वाटते. म्हणूनच, मला मोठे होऊन शिक्षक बनावेसे वाटते.

4. युद्धप्रसंगी सैनिक जिवाची बाजी लावून लढत असतो.
उत्तर:
जीवाची बाजी लावणे – घोडखिंडीत शत्रूला रोखण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जीवाची बाजी लावली.

5. मच्छीमार मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते.
उत्तर:
जीवाच्या आकांताने ओरडणे – पुरम्च्या पाण्यात एका लहानग्याला वाहून जाताना पाहून लीना जीवाच्या आकांताने ओरडली.

6. उत्तरे लिहा.

(१) जाहिरातीचा विषय-
(२) जाहिरात देणारे (जाहिरातदार) –
(३) वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक-
(४) जाहिरात कोणासाठी आहे?-
उत्तर:
(१) जाहिरातीचा विषय – जि. प. वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव येथे प्रवेश
(२) जाहिरात देणारे (जाहिरातदार) – शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव
(३) वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक – घटक १००% गुणवत्तेची हमी
(४) इयत्ता पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी.


7. वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यांत कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते ?
उत्तर:
वरील जाहिरातीमध्ये शाळेची वैशिष्ट्ये व विद्यार्थी योजना टॅबच्या आकारात बसवल्यास ते अधिक आकर्षक वाटेल. ‘तंत्रज्ञानाची कास धरत, घडवूया उद्याचा भारत’ असे वाक्य शाळेच्या नावाखाली टाकता येईल. याशिवाय, संपर्क क्रमांक अथवा वेबसाइट नमूद केल्यास संपर्काकरता योग्य माहिती उपलब्ध होईल.

कृती १ – आकलन

8. चौकटी पूर्ण करा.

राधिका मेनन यांनी कोचीमधील या कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला → □
प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना याची माहिती झाली → □
उत्तर:

ऑल इंडिया मरीन कॉलेज
समुद्री जहाजातली संवादप्रणाली
[राधिका या केरळच्या ………………
……………… स्वप्न पूर्ण झाले.]

कृती २ – आकलन

9. चुकीचे विधान शोधा.

अ. मोकळ्या वेळेत राधिका यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं, फिरणं व्हायचं.
ब. जहाजात काम करायला राधिका फारच उत्सुक होत्या.
क. राधिका यांनी वायुसेनेत जाण्याचे निश्चित केले.
ड. राधिका यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
उत्तर:
राधिका यांनी वायुसेनेत जाण्याचे निश्चित केले.

10. हे केव्हा घडले ते लिहा.

i. राधिका यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला, जेव्हा…
उत्तर:
त्यांनी २०१० साली नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केले.

ii. राधिका यांच्या अडचणी वाढल्या, जेव्हा…
उत्तरः
त्या आई बनल्या.

11. का ते काह

i. घरापासून लांब रहावं लागत असूनही राधिका खूश होत्या; कारण…
उत्तर:
रोमांचकारी प्रवास करणं हे त्यांच्या आवडीचं काम होतं.

ii. राधिका यांच्या नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होती; कारण…
उत्तर:
ते नेव्हीमधील एक रेडिओ ऑफिसर असून राधिका व ते एकाच व्यवसायात होते.

कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती

12. ‘आजची स्त्री सर्व आव्हाने पेलणारी आहे’ याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
पूर्वी चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित असलेले स्त्रियांचे जीवन आता व्यापक बनलेले दिसते. असे एकही क्षेत्र नाही जेथे स्त्रियांनी आपल्या यशाची छाप उमटवली नाही. ही स्त्री कुटुंबाची जबाबदारी तर समर्थपणे उचलतेच शिवाय तितक्याच सक्षमपणे ती नोकरी, व्यवसायाची जबाबदारीही पार पाडते. तारेवरची कसरत करत ती कौटुंबिक व व्यावसायिक जीवनातील समतोल साधते. कोणत्याही क्षेत्रात स्त्री म्हणून ती मागे राहत नाही. उलट दोन्ही आघाड्या सांभाळून ती संसाराचा व व्यवसायाचा गाडा हाकते. पुरुषांच्या खांदयाला खांदा लावून ती सारी आव्हाने लिलया पेलते. आजची स्त्री ही अगाध सामर्थ्याचे रूप आहे हे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


13. परिणाम लिहा.

i. समुद्रात जोरांचे वादळ सुटले.
परिणाम: समुद्री लाटांनी रौद्र रूप धारण केले, मोसमाचा अवतार खतरनाक बनला आणि मासेमाऱ्यांची नाव लाटांच्या गर्तेत सापडली.

ii. अधिकाऱ्याने समुद्रात नाव फसल्याची सूचना राधिका यांना दिली.
परिणाम: राधिका यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली. नाव बुडण्याच्या अवस्थेत आहे हे लक्षात येताच एक क्षणही वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली.

iii. वादळाचा जोर मोठा होता.
परिणाम: त्यामुळे, बचावकार्य करणाऱ्यांना बुडणाऱ्या नावेपर्यंत जाता येत नव्हते.

14. कारण लिहा.
मच्छिमारांना वाचवण्याचा दुसरा प्रयत्नदेखील वाया गेला; कारण…
उत्तर:
वादळाच्या जोरामुळे मच्छिमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते, तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते.

कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती

15. प्रस्तुत परिच्छेदातून राधिका यांचे कोणते गुण निदर्शनास येतात? तुमचे मत लिहा.
उत्तर:
प्रस्तुत परिच्छेद हा राधिका यांच्यातील गुणविशेष अधोरेखित करणारा आहे. या परिच्छेदातून राधिका यांचा कार्यतत्परता हा गुण दिसून येतो. मासेमाऱ्यांची नाव बुडत असल्याचे लक्षात येताच तातडीने त्यांच्या सुटकेची मोहिम हाती घेणे हे त्यांच्या कार्यतत्परतेचे उदाहरण आहे. त्यांचे प्रसंगावधान या परिच्छेदातून स्पष्ट होते. वादळाचा जोर वाढत असताना, बोट बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा स्थितीत एकही क्षण विलंब न करता त्यांनी बचावकार्य सुरू केले. यातून त्यांचे प्रसंगावधान दिसून येते. याशिवाय, एवढ्या मोठ्या वादळात, लाटांनी रौद्र रूप धारण केलेले असताना स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता इतरांना वाचवण्याचा केलेला प्रयत्न राधिका यांच्यातील माणुसकीचे, कर्तव्यनिष्ठेचे व धाडसाचे दर्शन घडवतो. परिस्थिती अधिकाधिक बिकट होत असतानाही सातत्याने प्रयत्नशील राहणे हा गुणही येथे दिसून येतो. अपयशाने न खचता पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे यातून त्यांचा आशावाद, त्यांची हिंमत दिसून येते. या परिच्छेदात कणखर वृत्तीच्या, कोणत्याही संकटांना न घाबरणाऱ्या, निडर अशा राधिका दिसून येतात.