Chapter-2.1                       जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव    


१. संत नामदेव कोण होते?

उत्तर: ते वारकरी संप्रदायातील संतकवी होते.

२. संत नामदेवांनी कोणत्या भाषांमध्ये रचना केली?

उत्तर: मराठीत आणि हिंदीत.

३. संत नामदेवांची भाषा कशी आहे?

उत्तर: सुबोध, सरळ व साधी.

४. पंजाबात त्यांनी कोणता कार्यप्रकार केला?

उत्तर: भागवत धर्माची पताका फडकवली.

५. गुरु ग्रंथसाहेबात संत नामदेवांची किती कवने आहेत?

उत्तर: एकसष्ट (६१) कवने.

६. गुरु ग्रंथसाहेबात त्यांच्या रचनांचा कोणत्या नावाने उल्लेख आहे?

उत्तर: ‘भक्त नामेदवजी की मुखबानी’.

७. संत नामदेवांची अभंगगाथा पुस्तकरूपात कधी प्रसिद्ध झाली?

उत्तर: इ.स. १८९२ मध्ये.

८. अभंगामध्ये संतांना कोणाशी तुलना केली आहे?

उत्तर: वृक्षाशी.

९. वृक्ष मान–अपमान कसा घेतो?

उत्तर: वृक्ष मान-अपमान दोन्ही समानपणे सहन करतो.

१०. संतांचे वर्तन कसे असते?

उत्तर: वृक्षाप्रमाणे नम्र, शांत व सहनशील.

११. प्राणी पूजा करण्यास आला तर वृक्षाला कसे वाटते?

उत्तर: त्याला त्या सुखाची जाणीव होत नाही.

१२. कोणी तोडायला आले तर वृक्ष काय म्हणत नाही?

उत्तर: “मला छेदू नका” असे म्हणत नाही.

१३. या अभंगाचा मुख्य संदेश काय आहे?

उत्तर: संतांचे सहनशील, समभावी व प्रेमळ स्वरूप.

१४. “निंदास्तुति सम मानिती” याचा अर्थ?

उत्तर: निंदा व स्तुती दोन्ही त्यांना समान वाटतात.

१५. संत कसे असतात?

उत्तर: पूर्ण धैर्यवान आणि स्थिरचित्त.

१६. संतांची भेट झाल्यास काय होते?

उत्तर: जीव आणि शिव म्हणजे आत्मा व परमात्मा यांचा मिलाप होतो.

१७. अभंगातील ‘सज्जन’ म्हणजे कोण?

उत्तर: संतस्वभावाचे, शांत व उदात्त व्यक्तिमत्त्वाचे लोक.

१८. “वृक्षाची उपमा” का दिली आहे?

उत्तर: कारण वृक्ष निःस्वार्थ, समभावी आणि सहनशील असतो.

१९. संत नामदेवांचे अभंग कसे मानले जातात?

उत्तर: उत्कट आणि भक्तीभावाने परिपूर्ण.

२०. संतांची महती कशातून सांगितली आहे?

उत्तर: वृक्षाच्या उपमेच्या माध्यमातून.

२१. “पूर्ण धैर्यवंत साधु” म्हणजे काय?

उत्तर: संकटात न ढळणारा, संयमी व शांत संत.

२२. संत निंदा का सहन करतात?

उत्तर: कारण ते अहंकाररहित व समभावी असतात.

२३. संतांना मान–अपमानाचा फरक का जाणवत नाही?

उत्तर: त्यांचा स्वभाव उदात्त व अहंकारशून्य असतो.

२४. वृक्षाला पूजा केली तरी त्याला आनंद का होत नाही?

उत्तर: कारण त्याला ‘अहंभाव’ नसतो.

२५. अभंगातील ‘जीव-शिवाची गांठी पडणे’ म्हणजे काय?

उत्तर: संतसंगतीमुळे आत्मा परमात्म्याशी एकरूप होणे.

Answer by Dimpee Bora