Chapter 10
१. हे पत्र कोणी लिहिलं आहे?
उत्तर: शाळेतील शिपायाने (आप्पांनी) लिहिलं आहे.
२. शिपायाला हे पत्र का लिहावं वाटलं?
उत्तर: कारण विद्यार्थ्यांशी रोज संवाद होत नाही, त्यामुळे मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याने पत्र लिहिलं.
३. शिपायाने शाळेत शिक्षण पूर्ण का केलं नाही?
उत्तर: घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे पूर्ण वेळ शाळेत बसू शकला नाही.
४. शिपायाला काय आवडते?
उत्तर: वर्गात काय शिकवले जाते ते कान देऊन ऐकायला आवडते.
५. विद्यार्थी कोणत्या टप्प्यावर आहेत?
उत्तर: ते शाळा सोडून कॉलेजमध्ये जाण्याच्या टप्प्यावर आहेत.
६. शिक्षक दिनी मुलांना काय व्हायला आवडतं?
उत्तर: मुख्याध्यापक किंवा शिक्षक.
७. मुलांना शिपाई व्हायला का आवडत नाही?
उत्तर: कारण त्यांना ते कमीपणाचं वाटतं.
८. शिपायाचं कोणत्या गोष्टीवर विश्वास आहे?
उत्तर: कोणतंही काम मनापासून केलं तर ते मोठं वाटतं.
९. चार्जरचं उदाहरण का दिलं आहे?
उत्तर: कारण छोट्या वस्तूंचंही मोठं महत्त्व असतं हे सांगण्यासाठी.
१०. खेळपट्टीचं महत्त्व कोणाशी जोडलं आहे?
उत्तर: विराट कोहली किंवा धोनीसारख्या कॅप्टन्ससोबत.
११. सुदर्शन पटनायक कोण आहेत?
उत्तर: वाळूत शिल्प तयार करणारे प्रसिद्ध कलाकार.
१२. बिस्मिल्ला खान का प्रसिद्ध झाले?
उत्तर: कारण त्यांनी सनई मनापासून वाजवली.
१३. ग्रंथालयात पुस्तकांवर धूळ का नाही?
उत्तर: कारण शिपाई मनापासून काम करतो.
१५. फुलपाखरांचं उदाहरण का दिलं?
उत्तर: त्यांचं सुंदर आणि वेगळं जीवन अभ्यासण्यासाठी.
१६. मधमाशा काय शिकवतात?
उत्तर: मेहनतीची किंमत आणि सहकार्य.
१७. मुंबईतील त्या व्यक्तीचं काम काय आहे?
उत्तर: दर आठवड्याला नळ गळतो का हे तपासणे.
१८. त्या व्यक्तीमुळे काय फायदा झाला?
उत्तर: लाखो लिटर पाणी वाचलं.
१९. एका मुलाने वाढदिवसाचे पैसे कशासाठी वापरले?
उत्तर: झोपडपट्टीतील मुलांसाठी पक्का पूल बांधण्यासाठी.
२०. प्रत्येकाने दहा झाडं लावली तर काय होईल?
उत्तर: देश निसर्गसंपन्न होईल.
२१. मुलांना झाडांची नावं माहीत नसतात, का?
उत्तर: कारण त्यांना कार्टून्सची नावं जास्त माहीत असतात.
२२. झाडं मोठी झाली तर काय फायदा होतो?
उत्तर: पिढ्यानपिढ्या सावली मिळते.
२३. श्रीमंतीचं खरे प्रतीक काय मानलं आहे?
उत्तर: घराभोवती झाडी असणं.
२४. लोक परदेशात का जाऊ इच्छितात?
उत्तर: निसर्ग वाचवायचा आणि पैसे कमवायचे म्हणून.
२५. शाळेच्या भिंतीवर नाव यायचं असेल तर काय करावं लागतं?
उत्तर: परीक्षेत पहिलं यावं लागतं.
२६. शाळेच्या ग्रंथालयात नाव यायचं असेल तर काय करावं लागतं?
उत्तर: स्वतःचं पुस्तक लिहावं लागतं.
२७. शिपायाला कोणता पदार्थ खायला आवडतो?
उत्तर: हुरडा.
२८. वेरूळ अजिंठा कोणत्या लोकांनी बांधले?
उत्तर: आपल्या पूर्वजांनी.
२९. शिपायाने विद्यार्थ्यांना गोंधळ करताना कुठे पाहिलं?
उत्तर: मैदानात, स्नेहसंमेलनात, होस्टेलवर.
३०. शिपायाचा गोंधळावर काय दृष्टिकोन आहे?
उत्तर: तो त्याचा आनंद घेतो, रागावत नाही.
३१. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना दहावीत किती गुण होते हे कोणाला माहीत आहे का?
उत्तर: नाही.
३२. डॉ. कलाम का ओळखले जातात?
उत्तर: कारण ते आदर्श व्यक्तिमत्त्व होते.
३३. आयुष्यात महत्त्वाचं काय आहे?
उत्तर: तुम्ही आयुष्य कसं जगता आणि जगाकडे कसं बघता.
३४. परीक्षेचे गुण आयुष्यात किती महत्त्वाचे असतात?
उत्तर: फारसे नाहीत; व्यक्तिमत्त्व महत्त्वाचं असतं.
३५. शिपायाचा विद्यार्थ्यांवर काय विश्वास आहे?
उत्तर: ते भविष्यात नक्कीच काहीतरी भव्यदिव्य करतील.
Answer by Dimpee Bora