Chapter 2 २.) बनगरवाडी-व्यंकटेश माडगूळकर
1. बायकोने नवऱ्याला कोणता प्रश्न विचारला?
उत्तर: बायकोने विचारले – “तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का?”
2. नवऱ्याने बायकोच्या प्रश्नाला काय उत्तर दिले?
उत्तर: नवऱ्याने उत्तर दिले – “नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार!”
3. इथे विनोद का तयार झाला?
उत्तर: कारण ‘बनवणे’ या शब्दाचा योग्य अर्थ इथे नाही; बनवणे म्हणजे फसवणे, म्हणून तो माणूसच राहण्याचे म्हणतो.
4.'बनवणे' या शब्दाचा मूळ मराठी अर्थ काय आहे?
उत्तर:‘बनवणे’ या शब्दाचा मूळ मराठी अर्थ आहे फसवणे किंवा गंडवणे.
5. स्वयंपाकात मराठीत कोणते शब्दप्रयोग योग्य आहेत?
उत्तर: पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, भात रांधणे, कढी करणे, कुकर लावणे इ.
6. 'मारणे' या क्रियापदाचे काही वेगळे अर्थ सांगा.
उत्तर: गप्पा मारणे, शिट्टी मारणे, थापा मारणे, पाकीट मारणे, टिचकी मारणे, हातपाय मारणे, माश्या मारणे इ.
7. 'खस्ता खाणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
उत्तर: खस्ता म्हणजे इथे अडचणी/दु:ख भोगणे.
8. 'कंठस्नान घालणे' म्हणजे काय?
उत्तर: युद्धात शत्रूचा वध करणे.
9. 'खांद्याला खांदा लावणे' म्हणजे काय?
उत्तर: सहकार्य करणे.
10. 'खांदा देणे' म्हणजे काय?
उत्तर: प्रेताला खांदा देणे, म्हणजे शवयात्रेत सहभागी होणे.
11. 'अक्कलवान' आणि 'अकलेचा कांदा' यातला फरक काय?
उत्तर: अक्कलवान म्हणजे हुशार; अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा – जो काहीवेळा उपहासार्थही वापरला जातो.
12. 'तिला हसणे' आणि 'तिच्याशी हसणे' यात काय फरक आहे?
उत्तर: ‘तिला हसणे’ म्हणजे तिची चेष्टा करणे; ‘तिच्याशी हसणे’ म्हणजे प्रेमाने हसणे.
13. योग्य प्रत्यय न वापरल्यास काय होते?
उत्तर: वाक्याचा अर्थच बदलतो किंवा गोंधळ होतो.
14. 'तुला मदत करणे' आणि 'तुझी मदत करणे' यातले योग्य रूप कोणते?
उत्तर: ‘तुला मदत करणे’ योग्य आहे.
15. मराठीने कोणत्या भाषांमधून शब्द घेतले आहेत?
उत्तर: संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी.
16.'मोरांबा' या शब्दाचा अर्थ काय?
उत्तर:णून मोरांबा म्हणजे साखरेतला अंबा.
17. 'कदर' शब्द कुठून आला?
उत्तर:अरबी भाषेतून.
18. 'अनसूया' या नावाचा शब्दसंधी कसा आहे?
उत्तर: ‘अन् + असूया’ = अनसूया (मत्सर नसलेली).
19. 'कलेवर' शब्दाचे दोन अर्थ काय?
उत्तर: एक ‘कला’ चे रूप (कलेवर – कला+इवर) आणि दुसरा ‘कलेवर’ म्हणजे शव.
20. लेखकानुसार आपल्याला आपल्या भाषेबद्दल काय करायला हवे?
उत्तर: तिचा योग्य सन्मान राखावा, तिचे ज्ञान वाढवावे, आणि ती शुद्ध, समृद्ध ठेवावी.
Answer by Dimpee Bora