Chapter 8
१) होळी झाल्यावर हवामानात काय बदल होत असे?
उत्तर: होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत असे.
२) आंब्यावर काय येऊन घमघमत असे?
उत्तर: आंब्यावर मोहोर येऊन घमघमत असे.
३) परीक्षा कधी यायच्या?
उत्तर: मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा तोंडावर यायच्या.
४) अंगणात अंथरुणं कधी पडायची?
उत्तर: सुट्टी लागल्यावर मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची.
५) मार्च-एप्रिलमध्ये लेखकाला कुठे झोपायला मिळायचं?
उत्तर: मार्च-एप्रिलमध्ये लेखकाला गॅलरीत झोपायला मिळायचं.
६) लेखक झोपताना कोणता आवाज ऐकायची वाट पाहत असे?
उत्तर: कोकिळेचं 'कुहू' ऐकायची वाट पाहत असे.
७) अभ्यास कसा वाटायचा?
उत्तर: अभ्यासाचा आळस वाटायचा नाही, पाठांतर आवडायचं.
८) नेमलेली पुस्तकं कशी वाचली जायची?
उत्तर: गोष्टीच्या पुस्तकांइतकीच आवडीने पुन्हा पुन्हा वाचली जायची.
९) सुट्टीची वाट कशी लागायची?
उत्तर: अभ्यासाचं वहीपुस्तक बाजूला झालं की लगेच सुट्टीची आठवण यायची.
१०) अंगणात कुठलं झाड होतं?
उत्तर: हजारी मोग-याचं झाड होतं.
११) शनिवारवाड्यात काय वेचून आणायचं?
उत्तर: बकुळीची फुलं वेचून आणायची.
१२) माठात काय घालायचे?
उत्तर: माठात वाळा घालायचे.
१३) आई-आत्या काय करायच्या?
उत्तर: कुरडया-पापड्यांची घाई करायच्या.
१४) अंगणात काय पसरायचं?
उत्तर: अंगणभर वाळवणं पसरायची.
१५) कैरीपासून काय बनायचं?
उत्तर: कैरीची डाळ आणि पन्हं बनायचं.
१६) बर्फाचे गोळे कधी मिळायचे?
उत्तर: कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळायचे.
१७) लेखकाला सुट्टीत काय आवडायचं?
उत्तर: खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं वाचायला.
१८) वाड्यात माळा कुठे होता?
उत्तर: वाड्याचा चौथा मजला म्हणजे माळा होता.
१९) लेखकाला माळ्यावर काय करायला आवडायचं?
उत्तर: पुस्तकांच्या गराड्यात बसायला आवडायचं.
२०) पुस्तकं वाचताना लेखकाला काय जाणवायचं?
उत्तर: नवे देश, माणसं, प्रसंग आणि शब्दांची जादू जाणवायची.
२१) लेखकाला भाषेबद्दल काय समजायचं?
उत्तर: भाषेची ताकद आणि लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजायची.
२२) पोपट कुठल्या झाडावर यायचे?
उत्तर: घरामागच्या उंबराच्या झाडावर.
२३) उंबर झाडाचं वर्णन कसं आहे?
उत्तर: पिकलेले उंबर, राघूंचे हिरवे पंख – सुंदर दिसायचं.
२४) कवितेचं बोट लेखकानं कसं धरलं?
उत्तर: चांगलं घट्ट धरलं.
२५) कविता लेखकाकडे कधी यायची?
उत्तर: कवितेला हवं तेव्हा, कधीही मध्यरात्रीसुद्धा.
२६) लेखकाला कवितेची वाट कशी पाहावी लागायची?
उत्तर: कधी कधी खूप वाट पाहावी लागायची.
२७) लेखकाच्या आत्याचं काम कुठे होतं?
उत्तर: उरुळीकांचनच्या मराठी शाळेत.
२८) आत्या किती उशिरा घरी यायची?
उत्तर: रात्री नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत उशिरा यायची.
२९) लेखक आणि भावंडं कोणाची वाट बघायची?
उत्तर: आत्याची वाट बघायची.
३०) म्हातारीच्या वाट पाहण्यातून लेखकाला काय समजतं?
उत्तर: वाट पाहणं हे दुःख-दडपण देणारं असलं तरी तेच गोष्टीचं खरं मोल शिकवतं, संयम देतं आणि आयुष्याची ओढ वाढवतं.
Answer by Dimpee Bora😚