Chapter 16
१. जगदीश खेबुडकर यांची कोणती ओळख आहे?
उत्तर: जगदीश खेबुडकर हे प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथालेखक, संवादलेखक, लघुकथा, नाटक व दूरदर्शन मालिकांचे लेखक होते.
२. त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
उत्तर: त्यांच्या गीतांमध्ये साधेपणा, सोपेपणा, अर्थगर्भता आणि नादमय शब्दांची वैशिष्ट्ये होती.
३. जगदीश खेबुडकर यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले?
उत्तर: त्यांना महाराष्ट्र शासनाकडून ११ वेळा सन्मानित करण्यात आले असून गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
४. कवीने माणसाला कोणता संदेश दिला आहे?
उत्तर: कवीने माणसाला परावलंबित्व टाकून, स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून, स्वकष्टाने जीवन जगण्याचा संदेश दिला आहे.
५. ‘आकाशी झेप’ या कवितेतील ‘पिंजरा’ हे प्रतीक काय दर्शवते?
उत्तर: ‘पिंजरा’ हे सुरक्षिततेचे आणि परावलंबित्वाचे प्रतीक आहे.
६. पाखराला देवाने काय दिले आहे आणि त्याचा उपयोग काय करावा असे कवी सांगतात?
उत्तर: देवाने पाखराला पंख दिले असून ते वापरून दर्या-डोंगर ओलांडत स्वच्छंदी विहार करावा असे कवी सांगतात.
७. कष्टाविना काय मिळत नाही?
उत्तर:कष्टाविना फळ मिळत नाही.
८. कवितेतील "घामातून मोती फुलले" या ओळीचा अर्थ काय?
उत्तर: या ओळीचा अर्थ असा की कष्टाचे चीज होते, घामाचे सोनं होते, श्रमातून यश मिळते.
९. कवीने पाखराच्या प्रतीकातून काय दाखवले आहे?
उत्तर: पाखराच्या प्रतीकातून कवीने माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून दिली आहे.
१०. या कवितेचा मुख्य संदेश काय आहे?
उत्तर: स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, ध्येयासाठी कष्ट करा आणि त्यातून मिळणाऱ्या यशाचा निखळ आनंद घ्या — हाच कवितेचा मुख्य संदेश आहे.
Answer by Dimpee Bora