chapter 12

1) शंकराचार्यांनी कोणाला संन्यासाचे महत्त्व समजावले?

उत्तर: मातेला।


2) शंकराचार्यांनी कोणती प्रतिज्ञा केली होती?

उत्तर: "माते, जेव्हा तू मला आठवशील, तेव्हा मी लगेच तुझ्याकडे येईन."


3) शंकराचार्यांचे गुरू कोण होते?

उत्तर: गोविंदभगवत्पाद।


4) शंकराचार्यांनी कोणती शास्त्रं अभ्यासली?

उत्तर:  सर्व दर्शनं (तत्त्वशास्त्रं)।


5) त्यांनी कशासाठी प्रवास केला?

उत्तर:  वैदिक धर्माची स्थापना करण्यासाठी।


6) गंगेस्नानास जाताना कोण भेटला?

उत्तर:  एक गरीब, मलिनवस्त्रधारी मनुष्य।


7) शिष्यांनी त्या गरीब माणसाला काय म्हटले?

उत्तर: "अपसर, अपसर।"


8) त्या माणसाने कोणता तत्त्वज्ञान सांगितले?

उत्तर: आत्मा सर्वत्र समान आहे, शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे।


9) शंकराचार्यांनी त्या माणसाला पाहून काय केले?

उत्तर: त्याला प्रणाम केला।


10) शंकराचार्यांनी त्या प्रसंगानंतर कोणते स्तोत्र लिहिले?

उत्तर: मनीषा पञ्चक

11) 'मनीषा' शब्दाचा अर्थ काय?

उत्तर:  दृढ निश्चय किंवा विचार।


12) शंकराचार्यांचे बालवयातले विशेष कार्य काय होते?

उत्तर: अष्टवर्षी चतुर्वेदी बनले।


13) 'ज्ञानं तु कस्मादपि ग्राह्यम्' या वाक्याचा अर्थ काय?

उत्तर: ज्ञान कोणाकडूनही ग्रहण करावे।


14) शंकराचार्यांची तत्वज्ञानाची संकल्पना कोणती होती?

उत्तर: अद्वैत वेदान्त।


15) आचार्यांनी कोणत्या ठिकाणी प्रचार केला?

उत्तर: आसेतु हिमाचल पर्यंत।


16)  शंकराचार्यांच्या मते आत्मा कोणाचा अंश आहे?

उत्तर: परमेश्वराचा अंश।


17) शरीर कोणत्या घटकांपासून बनले आहे?

उत्तर: पञ्चमहाभूतांपासून।


18) गुरू कोण असतो – या विषयी आचार्यांचे मत काय होते?

उत्तर:  ज्याच्याकडून ज्ञान मिळते तोच गुरू।


19) 'अपसर' हा शब्द का वापरला गेला?

उत्तर: गरीब माणसाला दूर करण्यासाठी शिष्यांनी तो उच्चारला।


20) शंकराचार्यांनी कितव्या वर्षी भाष्ये लिहिली?

उत्तर: १६ व्या वर्षी।

21) शंकराचार्यांनी संन्यास घेण्यापूर्वी मातेला काय समजावले?

उत्तर: संन्यासी केवळ एका व्यक्तीचा पुत्र नसतो, तर संपूर्ण जग त्याचे कुटुंब असते. म्हणून त्यांनी मातेला सांगितले की, ती आठवण काढल्यावर तो नक्की परतेल.


22) गंगास्नान प्रसंगात आचार्यांनी काय शिकले?

उत्तर: एक गरीब माणूस शुद्ध आत्मज्ञान सांगू शकतो हे जाणवले. आत्मा सर्वत्र समान असल्यामुळे कोणीही तुच्छ नाही हे त्यांना उमगले.


23) 'ज्ञानं तु कस्मादपि ग्राह्यम्' या विचाराची सध्याच्या काळात उपयुक्तता काय आहे?

उत्तर: आज प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकता येते. जात-पात, वय, स्थिती न पाहता ज्ञान ग्रहण करणे गरजेचे आहे.


24) 'मनीषा पञ्चकम्' हे स्तोत्र लिहिण्यामागचा हेतू काय होता?

उत्तर: आत्मज्ञान देणारा कोणीही असू शकतो हे मान्य करून त्या सत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी।


25) शंकराचार्यांच्या जीवनातील प्रचारकार्याचा प्रभाव काय होता?

उत्तर: त्यांनी संपूर्ण भारतभर वेदान्त प्रचार केला, अनेक मठांची स्थापना केली आणि वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले।


26) शंकराचार्यांचे बाल्य किती बुद्धिमान होते? उदाहरण द्या।

उत्तर: ते अष्टवर्षी चतुर्वेदी होते, म्हणजे आठव्या वर्षीच त्यांनी चारही वेद शिकून घेतले होते।


27) त्यांनी संन्यास का घेतला?

उत्तर:  वैदिक धर्माचे रक्षण करणे, आत्मज्ञानाचा प्रचार करणे आणि अध्यात्मिक साधना करणे – या हेतूने।


28) 'आसेतुहिमाचलं' या शब्दाचा अर्थ काय?

उत्तर: दक्षिणेतील सेतू (रामसेतू) पासून उत्तरेतील हिमालयापर्यंत – संपूर्ण भारत।


29) शरीर आणि आत्म्याच्या भिन्नतेचे तत्त्वज्ञान कोण मांडते?

उत्तर:  वेदान्त (विशेषतः अद्वैत वेदान्त)।


30) आपल्याला शंकराचार्यांच्या जीवनातून काय शिकायला मिळते?

उत्तर:  ज्ञान, विनय, वैश्विक दृष्टी, सर्वसमत्व आणि कर्मनिष्ठा हे जीवनाचे आधार असावे


Answer by Dimpee bora