Chapter 1                                       वेगवशता 

 १. प्रश्न: गतीची गरज कधी असते?

उत्तर: यथाप्रमाण गती ही जीवनाची गरज आहे.


२. प्रश्न: अप्रमाण गती म्हणजे काय?

उत्तर: अवास्तव आणि अनावश्यक गती म्हणजे अप्रमाण गती.


३. प्रश्न: अवास्तव वेग कशाला म्हणतात?

उत्तर: कामापुरता आवश्यक नसलेला जास्त वेग म्हणजे अवास्तव वेग.


४. प्रश्न: अमेरिकेत घरं व कार्यालयांमध्ये किती अंतर असते?

उत्तर: निदान शंभर मैलांचे अंतर असते.


५. प्रश्न: अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी काय करावे लागते?

उत्तर: दूरवर प्रवास करावा लागतो.


६. प्रश्न: अमेरिकेत माणसामाणसांत दुरावा का निर्माण होतो?

उत्तर: कारण घरं, कार्यालयं व बाजारपेठा एकमेकांपासून दूर असतात.


७. प्रश्न: अमेरिकन जीवनशैली भारतीयांनी का पत्करू नये?

उत्तर: कारण भारतात अंतरे कमी आहेत आणि माणसे अधिक आहेत.


८. प्रश्न: मुंबईतील जीवन गाड्यांनी कसे सांधलेले आहे?

उत्तर: रेल्वे गाड्यांनी.


९. प्रश्न: गाडीत चढल्यावर माणसांचे धावणे का थांबते?

उत्तर: कारण गाड्या रूळावरून थेट गंतव्याला नेतात.


१०. प्रश्न: खरी अडचण कोणत्या वाहनांमुळे येते?

उत्तर: दोन आणि चारचाकी वाहनांमुळे.


११. प्रश्न: वाहनांचा योग्य वापर कसा करावा?

उत्तर: वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी कामापुरतेच वाहन वापरावे आणि वेग मर्यादित ठेवावा.


१२. प्रश्न: वाचलेला वेळ माणसे कशासाठी वापरतात?

उत्तर: पुन्हा वाहनांच्या आहारी जाण्यासाठी.


१३. प्रश्न: “माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.” याचा अर्थ काय?

उत्तर: सुरुवातीला माणूस वाहन वापरतो, पण हळूहळू वाहनाचा मोह वाढून तो त्याच्यावर गुलाम होतो.


१४. प्रश्न: जीवन अधिक अर्थपूर्ण कधी होईल?

उत्तर: जेव्हा वाहनांचा वापर आटोक्यात ठेवला जाईल.


१५. प्रश्न: भारतीय समाजात वाहने खरेदी करण्यामागचे चुकीचे कारण काय आहे?

उत्तर: इतरांशी मानसिक स्पर्धा आणि ऐश्वर्याचे प्रदर्शन.


१६. प्रश्न: अनेक लोक दुचाकीवर फेरफटका का मारतात?

उत्तर: फक्त दाखवण्यासाठी किंवा समाधानासाठी, कुठल्याही गरजेशिवाय.


१७. प्रश्न: उताऱ्यानुसार, लोक निसर्गरम्य ठिकाणी का जात नाहीत?

उत्तर: कारण त्यांना शहरातील प्रसिद्ध रस्त्यांवरच फिरणे आवडते.


१८. प्रश्न: वाहनांचा खरा उपयोग कोणता आहे?

उत्तर: वेळ वाचवणे आणि कामे सोपी करणे.


१९. प्रश्न: “वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते.” याचा अर्थ काय?

उत्तर: वाहनाचा वापर केवळ गरजेपुरता करावा, उगाच फिरण्यासाठी नाही.


२०. प्रश्न: रस्त्यावर चालण्याऐवजी पळणाऱ्याचा उल्लेख का केला आहे?

उत्तर: कारण अनाठायी वेगात धावणं हास्यास्पद आणि अनावश्यक असतं.


२१. प्रश्न: अप्रमाण वेग आत्मघातकी का ठरतो?

उत्तर: कारण त्यातून अपघात होतात, शरीरावर ताण येतो, मानसिक अस्वस्थता वाढते आणि आयुष्य धोक्यात येते.


२२. प्रश्न: अमेरिकन जीवनशैलीचे तोटे स्पष्ट करा.

उत्तर: अमेरिकेत घरं व बाजारपेठा दूर असल्याने माणसामाणसात दुरावा वाढतो, वाहनावर अवलंबित्व वाढते आणि मानवी नाती दुर्बल होतात.


२३. प्रश्न: भारतीय परिस्थिती अमेरिकेपेक्षा कशी वेगळी आहे?

उत्तर: भारतात अंतरे कमी आहेत, माणसे अधिक आहेत, त्यामुळे नाती जिव्हाळ्याची आहेत व भरधाव वेगाची आवश्यकता कमी आहे.


२४. प्रश्न: वाहनांचा चुकीचा वापर समाजात कोणते परिणाम घडवतो?

उत्तर: मानसिक स्पर्धा, ऐश्वर्यप्रदर्शन, अपघात व वेळेचा अपव्यय.


२५. प्रश्न: “गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते.” याचा अर्थ स्पष्ट करा.

उत्तर: रेल्वेत बसल्यावर प्रवासी शांत होतो कारण त्याला धावपळ करण्याची गरज नसते.


२६. प्रश्न: भरधाव वेगाचे शारीरिक परिणाम कोणते?

उत्तर: डोळ्यांवर ताण, मज्जातंतू कमकुवत होणे, मणक्यांना व कमरेला दुखणे.


२७. प्रश्न: अपघात का घडतात?

उत्तर: कारण वाहनाचा वेग वाढल्यावर त्याच्यावरचा ताबा कमी होतो आणि पुढे जाण्याच्या हव्यासामुळे धडक होतात.


२८. प्रश्न: रात्री भरधाव गाडी धावण्याला काय म्हणतात?

उत्तर: रातराणी.


२९. प्रश्न: भ0रधाव प्रवासाचे मानसिक दुष्परिणाम काय आहेत?

उत्तर: व्यग्रता, अस्वस्थता ताण आणि असंतोष.


३०. प्रश्न: उताऱ्यातील मुख्य संदेश काय आहे?

उत्तर: वाहनांचा वापर कामापुरता आणि मर्यादित वेगाने करावा; अनाठायी वेग व ऐश्वर्यप्रदर्शन टाळून जीवन शांत, आरोग्यपूर्ण व अर्थपूर्ण करावे.

Answer by Dimpee Bora