Chapter- 17                       क्षेत्र आज हा पाण्याचा


1. कवितेचा मुख्य विषय कोणता आहे?

उत्तर: पाणी हे अमूल्य आहे आणि त्याची बचत करणे आवश्यक आहे.


2. कवीने पाण्याच्या थेंबाची तुलना कोणाशी केली आहे?

उत्तर: मोत्याशी.


3. आभाळातील थेंब कुठे येतात?

उत्तर: वर्षेमधल्या सरीतून.


4. पावसाच्या सऱ्या येताना कशासारख्या भासतात?

उत्तर: मोत्यांची माळ ओवत असल्यासारख्या.


 5. मोती निसटून का जातात असे कवी सांगतो?

उत्तर: आपण त्यांचा योग्य संचय करत नाही म्हणून.


6. कवी संचय कोणाचा करायला सांगतो?

उत्तर: पाण्याच्या थेंबांचा (मोत्यांचा).


 7. ‘प्रश्न तुझ्या रे जीण्याचा’ याचा अर्थ काय?

उत्तर: पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे.


8. आभाळातील मोती मातीमधून काय पिकवतात?

उत्तर: धान्य व अन्न पिकवतात.


9. निसर्गाला कोणाचे मोल माहित आहे?

उत्तर: पाण्याचे.


10.  माणसे तिजोरीत काय संचय करतात?

उत्तर: खणखणती नाणी (पैसा, सोने).


11. कवी माणसांना ‘कोती?’ का म्हणतो?

उत्तर: कारण माणसे पैशासाठी धडपडतात पण पाण्याचे महत्त्व विसरतात.


 12. कवितेत ‘वेडाचाळा’ कोणता म्हटला आहे?

 उत्तर: पाण्याची नासधूस करणे.


 13. स्वतःला ठगणे म्हणजे काय?

उत्तर: पाण्याचा अपव्यय करणे आणि स्वतःच्या भवितव्याला धोका निर्माण करणे.


14. कवी कोणता दृष्टिकोन बदलायला सांगतो?

उत्तर: निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन.


15. तहान भागवण्यासाठी सोन्याचा घोट उपयोगी आहे का?

उत्तर: नाही, पाणीच आवश्यक आहे.


16. सोन्याचा घोट हा उल्लेख का केला आहे?

 उत्तर: पैसा उपयोगी पण पाण्याची जागा घेऊ शकत नाही हे सांगण्यासाठी.


 17. ‘शब्द जाऊ दे अर्थ राहू दे’ यात कवी काय म्हणतो?

उत्तर: फक्त बोलून नको—कृतीतून पाण्याची कदर करा.


18. मोती निसटून जातात म्हणजे काय?

उत्तर: पाणी वाया जाते.


19. पाण्याचा थेंब बहुमोलाचा का आहे?

उत्तर: कारण तो जीवनासाठी अनिवार्य आहे.


20. निसर्ग जाणी मोल तयाचे — ‘तयाचे’ म्हणजे?

उत्तर: पाण्याचे.


 21. आभाळातील मोती म्हणजे काय?

 उत्तर: पावसाचे थेंब.


22. माणसे नाण्यांचा संचय का करतात?

उत्तर: पैशाला जास्त महत्त्व देतात म्हणून.


23. ‘तहानेसाठी सांग पुरे’ — कवी कोणता प्रश्न विचारतो?

उत्तर: सोन्याने तहान भागेल का?


 24. कवितेत कोणत्या मूल्यांवर भर दिला आहे?

उत्तर: पाणी संवर्धन, निसर्गप्रेम, जबाबदारी.


 25. पाण्याचा संचय करणं का महत्त्वाचं?

उत्तर: भविष्यासाठी आणि जीवनाच्या अस्तित्वासाठी.


26. ‘स्वतः होऊनी ठगण्याचा’ कशाकडे निर्देश करते?

उत्तर: मानव स्वतःच नुकसान करून घेतो ते.


27. कवी माणसांना काय बदलण्यास सांगतो?

उत्तर: जीवनशैली आणि विचारधारा.


28.  ‘आभाळातील बहुमोलाचा थेंब’ — बहुमोलाचा का?

उत्तर: कारण पाण्याची पर्याय नाही.


29. या कवितेचा मुख्य संदेश काय?

उत्तर: पाणी वाचवा; तेच जीवन आहे.

Answer by Dimpee Bora