Chapter 18 अनुवाद
प्रश्न 1.
फरक स्पष्ट करा. (प्रत्येक प्रकाराचे एक उदाहरण अपेक्षित)
(अ) अनुवाद-भाषांतर
उत्तरः
भाषांतर : म्हणजे एका भाषेतील आशय जसाच्या तसा दुसऱ्या भाषेत नेणे. उदा. विज्ञान तंत्रज्ञान या विषयावर आधारित पुस्तकांचे भाषांतर हे जसेच्या तसे केले जाते किंवा सरकारी अधिनियम जसे आहेत तसेच भाषांतरीत केले जातात. पूर्वीच्या काळी ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी बायबलचे मराठीत भाषांतर झाले. दोन भिन्न भाषिक व्यक्ती, समाज एकत्र येतात तेव्हा भाषांतर अपरिहार्य ठरते. अनुवाद : अनुवाद या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमध्ये शोधता येते.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद
मूळ धातू ‘वद’ म्हणजे बोलणे ‘अनु’ हा त्याचा उपसर्ग याचा अर्थ ‘मागील’. थोडक्यात आधी कोणी सांगितल्या नंतर सांगणे म्हणजेच श्रीकृष्णाने आधी गीतेत तत्त्वज्ञान सांगितले. तेच तत्त्वज्ञान संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिकेत सांगितले. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी गीतेचा अनुवाद केला असे म्हटले जाते. थोडक्यात शब्द, संरचना, शैली यांपेक्षा एकूण आशयावर भर देऊन केलेले भाषांतर म्हणजे अनुवाद होय. उदा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या wings of Fire या आत्मचरित्राचा मराठीत ‘अग्निपंख’ या नावाने माधुरी शानबाग यांनी केलेला अनुवाद.
(आ) रूपांतर-स्वैर अनुवाद
उत्तरः
रूपांतर : एखादया वाङ्मयप्रकारातील कलाकृती दुसऱ्या वेगळ्या वाङ्मयप्रकारात नेणे म्हणजे रूपांतरण होय. उदा. नटसम्राट या वि. वा. शिरवाडकर लिखित नाटकावर आधारित मराठीत ‘नटसम्राट’ या नावाने सिनेमा निघाला. मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवर आधारित ‘गमभन’ हे नाटक तसेच ‘शाळा’ हा मराठी चित्रपटही आला. स्वैर अनुवाद : स्वैर अनुवादात मूळ साहित्यकृतीमधील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण अनुवादित साहित्यकृतीत बदलले जाते. उदा. विसाव्या शतकातील श्रेष्ठ जर्मन नाटककार, दिग्दर्शक, संगीतज्ज्ञ, कवी आणि तत्त्वचिंतक ब्रेश्ट यांच्या ‘द थ्री पेनी ऑपेरा’ या मूळ जर्मन नाटकाचं पु. ल. देशपांडे यांनी तीन पैशाचा तमाशा’ हे स्वैर रूपांतर केले आहे.
प्रश्न 2.
अनुवादाची कार्यक्षेत्रे स्पष्ट करा.
उत्तर :
भारतात अनेक प्रांत, अनेक भाषा एकत्र नांदत असल्यामुळे इथे नेहमीच प्रांतिक अनुवाद होत असतात याशिवाय जागतिकीकरणामुळे इंग्रजीचे महत्त्व वाढले आहे. विविध विषयांची अद्ययावत माहिती इंग्रजीत उपलब्ध आहे. इंग्रजीतील हे ज्ञान विविध भाषांमध्ये जाण्याची प्रक्रिया निरंतर घडत असते. म्हणूनच अनुवादकांना आजच्या युगात अत्यंत महत्त्व आहे. महाराष्ट्रात अनुवादासाठी स्वतंत्र भाषा संचालनालय निर्माण झालेले आहे. त्यासाठी भाषा सल्लागार मंडळ अस्तित्वात आहे. पूर्वी अनुवाद हे साहित्याचे केले जात. आज तंत्रज्ञान विज्ञान इ. वेगवेगळ्या विषयांचे अनुवाद होत आहेत. रेडिओ, दूरचित्रवाणी, चित्रपट या माध्यमांत अनुवादाच्या मोठ्या संधी उपलब्ध ओत. अनेक आंतरराष्ट्रीय वाहिन्या आपले कार्यक्रम विविध प्रादेशिक भाषांमध्ये घेऊन येण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना सातत्याने अनुवादकांची गरज लागते. बहुराष्ट्रीय कंपन्या जगभर पसरलेल्या असतात. त्यांच्या उत्पादनांना, सेवांना लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांना स्थानिक भाषेत जाहिराती दयाव्या लागतात. यासाठी अनुवादकांची गरज असते. शिक्षण क्षेत्राचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यातील ज्ञान विविध लोकांपर्यंत विविध भाषांमध्ये पोहोचवण्याची गरज असते. यासाठीही अनुवादकांची गरज असते.
प्रश्न 3.
अनुवाद क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी तुमच्या शब्दांत नमूद करा.
उत्तर :
अनुवादामुळे सामाजिक, वैचारिक जडण घडण होते. त्यामुळे लक्ष्य भाषा संपन्न होतेच शिवाय नवीन वाङ्मयीन प्रवाह निर्माण होतात. उदा. मराठी दलित साहित्याच्या प्रेरणेमुळे हे गुजराथी दलित साहित्य निर्माण झाले. म्हणूनच ज्यांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त भाषा येतात त्यांना अनुवादाच्या क्षेत्रात प्रचंड मागणी आहे. भारतातील संपूर्ण भाषांतर कार्यामध्ये हिंदी भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणतेही साहित्य अखिल भारतीय पातळीवर न्यायचे असेल तर त्याचे हिंदी भाषांतर होणे गरजेचे असते. केंद्रशासनाने नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी अशी मंडळे त्यासाठी निर्माण केली आहेत. बिदागी, पुरस्कार अशा स्वरूपात अनुवाद कार्याला उत्तेजन दिले जाते. महाराष्ट्रात ‘आंतर-भारती’ या सानेगुरुजी प्रणीत संस्थेमार्फत अनुवाद भाषांतर कार्याला गती दिली जाते. विविध सिनेमे, विविध भाषांत डब होऊन त्या त्या प्रांतांत दाखवले जातात. परदेशातील काटुन फिल्म इथल्या प्रादेशिक भाषेत डब करून दाखवल्या जातात. हे करण्यासाठी मूळ कलाकृती समजून घेऊन त्याचे अपेक्षित असणाऱ्या भाषेत अनुवाद करण्यासाठी तज्ज्ञ माणसांची गरज लागते. जाहिरातीच्या वेगवेगळ्या प्रांतांत दाखवताना जाहिरात तीच दाखवून भाषा बदलली जाते. हे करण्यासाठी उत्तम अनुवादकांची आवश्यकता असते. परदेशी भाषा तर येत असेल तर दुभाषक म्हणून काम करता येते. भारताचे पंतप्रधान जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटले तेव्हा त्यांच्या हिंदी भाषणाचे भाषांतर अनुवाद करून ते इंग्रजीत ऐकवले गेले. हे आपण पाहिले. दुतावासात अशा परदेशी भाषा येणाऱ्या लोकांना प्रचंड मागणी आहे.
प्रश्न 4.
‘अनुवाद करणे ही सर्जनशील कृती आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
मर्यादित अर्थाने का होईना अनुवाद ही एक प्रकारची नवनिर्मितीच असते. अनुवादक तिला एक आपलेपण देतो. मूळ कलाकृतीच्या अनुरोधाने तो वाचकाला जिवंत, समृद्ध सौंदर्यानुभवाचा प्रत्यय देतो. तो जर आंधळेपणाने मुळाशी जखडून राहिला तर अनुवाद जिवंत वाटणारच नाही. त्यात कोरडेपणा येईल. अनुवाद करताना अनुवादकाला भाषेचे बंधन पाळावे लागते. उदा. अरेबियन नाईटचे रूपांतर, भाषांतर करायचे किंवा अनुवाद करायचे तर आजची भाषा वापरणे योग्य ठरेल याचे भान अनुवादकाला सांभाळावे लागते. कवितेचा अनुवाद करताना तर फार काळजी घ्यावी लागते. कारण कवितेतील शब्दांना नादांची लय असते. विनोदी साहित्य अनुवादित करताना मूळ भाषेतील गंमत निघून जाणार नाही हे पाहावे लागते. थोडक्यात अनुवादक दोन संस्कृतींना जोडतो. अनुवाद म्हणजे केवळ तांत्रिक रूपांतर नाही तर ती सर्जनशील कृती असते. हे कौशल्याचे काम आहे. हे कौशल्य अनुवादकाच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. कोणते साहित्य अनुवादासाठी निवडावे, त्याचे सामाजिक महत्त्व काय याचे भान अनुवादकाला बाळगावे लागते. विविध साहित्य प्रकारांची वैशिष्ट्ये त्याला माहीत असावी लागतात. भाषिक संदर्भ, सामाजिक संदर्भ, सांस्कृतिक संदर्भ त्याला समजून घ्यावे लागतात. मूळ साहित्यांचे बारकाईने अवलोकन करावे लागते. थोडक्यात अनुवाद असा झाला पाहिजे की मूळ कलाकृती कोणती आणि अनुवादित कलाकृती कोणती याचा संभ्रम निर्माण झाला पाहिजे. हे सगळे भान सांभाळणे ही तारेवरची कसरतच आहे. म्हणूनच अनुवाद करणे म्हणजे सर्जनशील कृती करणे.
प्रश्न 5.
अनुवाद करताना पाळायची पथ्ये तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
अनुवादकाची वृत्ती ही संशोधकाप्रमाणे असावी. खोलात जाऊन शोध घेतला नाही तर अनुवादात चूक होण्याची शक्यता असते. अनुवादक एकाच वेळी चांगला वाचक तर हवाच पण तो अभ्यासकही असायला हवा. जागतिक घडामोडींचे त्याला भान हवे. अनवाद करणं हे नाटकात काम करण्यासारखे आहे. दसऱ्याचे शब्द नट जसा दकश्राव्य माध्यमातन इतरांपर्यंत पोहोचवतो तसंच अनवादात दसऱ्याचे विचार. त्याचे साहित्यिक विश्व आपल्यापर्यंत आपल्या भाषेत पोहोचवतो. त्याने खालील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.अनुवादासाठी निवडलेली कलाकृती ही उत्कृष्ट व उपयुक्त असावी. मूळ कलाकृतीशी प्रामाणिक राहून अनुवाद केला पाहिजे. वर्णन विवेचन यात अचूकता व स्पष्टता असावी. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता त्याने कलाकृतीला न्याय दिला पाहिजे. स्वत:चे विचार त्याने अनुवाद करताना घुसडता कामा नयेत. मूळ भाषा व अनुवाद होणारी भाषा याचे त्याला ज्ञान असावे. वाचकांना समृद्ध करणारा अनुभव त्याने दिले पाहिजे. अनुवाद करताना मूळ नावांमध्ये बदल करू नये. कलाकृतीचे स्वरूप पाहून स्वैर अनुवाद असावा की शब्दशः अनुवाद असावा हे त्याने ठरवून घेणे गरजेचे असते.
प्रश्न 6.
‘अनुवादामुळे सांस्कृतिक संचित विस्तारते’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
एका भाषेतील कलाकृती ही दुसऱ्या भाषेत येते त्याला आपण अनुवाद म्हणतो. पण ही वाटते तेवढी सोपी-सरळ प्रक्रिया नाही. त्यात अनेक बाबींचा अंतर्भाव होतो. विशेषतः भौगोलिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी भिन्न असतील तर अनुवाद करणे हे एक आव्हान ठरते. इतर प्रदेशातील संस्कृती, रूढी-परंपरा याची या निमित्ताने वाचकांना ओळख होते. त्याचे भावविश्व व सांस्कृतिक विश्व समृद्ध होते. निग्रो साहित्याची जेव्हा जगाला ओळख झाली. तेव्हा त्यातून प्रेरणा घेऊन वंचित समाजाचे नवीन साहित्य उदयास आले. मराठीत निग्रो साहित्याच्या प्रभावातून दलित साहित्य जन्माला आले आणि भारतीय सांस्कृतिक, सामाजिक वास्तवाचे जगाला दर्शन झाले. त्यातूनच विषमतेच्या विरोधात लढे उभारले गेले. सामाजिक समतेच्या लढ्याला यश आले. आपल्या भोवतालचा समाज, त्यातील मर्यादित विश्व आणि प्रथा, परंपरा यांच्या पगड्यातून अनुवादित साहित्य आपल्याला बाहेर काढते. ‘एक होता कार्व्हर’ हा वीणा गव्हाणकर यांनी केलेला अनुवाद वाचकालाही अंतर्मुख करतो तर अब्दुल कलाम यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’च्या ‘अग्निपंख’ या माधुरी शानबाग यांनी केलेल्या अनुवादामुळे आपल्यालाही भारतीय अवकाश संशोधनाची सखोल माहिती मिळते. आपल्याही ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या जातात. या प्रक्रियेमुळे जगभरातील माणसे, त्यांची संस्कृती, रूढी, परंपरा, विचार, साहित्य, तंत्रज्ञान, समाज व्यवस्था याचा एकमेकांना परिचय होतो. महाराष्ट्र राज्य, साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘मराठी अनुवाद ग्रंथसूची’नुसार १९९८ पर्यंत एकूण ५९७४ पुस्तके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषेतून मराठीत अनुवादित झाली आहेत. हीच प्रक्रिया उलटही होते आहे. मराठीतून इंग्रजीत व इतर भाषेत साहित्य अनुवादित होत आहे. उदा. डॉ. नरेंद्र जाधव लिखित ‘आमचा बाप आणि आम्ही’ या आत्मचरित्राचे १५ भारतीय व परदेशी भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यामुळे भारतीय जीवनाची ओळख परदेशी वाचकांना झाली.
प्रश्न 7.
बोलीभाषा आणि प्रमाणभाषा याबाबतची अनुवादकाची भूमिका स्पष्ट करा.
उत्तरः
अनुवाद करताना मूळ साहित्यकृतीशी प्रामाणिक राहणे गरजेचे असते. त्यात स्वत:चे काही घालायचे नाही, काही वगळायचे नाही, बदल करायचे नाहीत आणि तरीही ते शब्दश: भाषांतर असता कामा नये ही तारेवरची कसरत अनुवादकाला करायची असते. यासाठी त्याला बोलीभाषा आणि प्रमाणभाषा याचा तारतम्याने विचार करावा लागतो. दैनंदिन जीवनव्यवहारात आपण प्रमाणभाषेपेक्षा बोलीभाषेचाच अधिक प्रमाणात वापर करतो. प्रमाणभाषेचा वापर शिक्षण, ग्रंथलेखन, शासनव्यवहार यांसाठी होतो. प्रमाणभाषा औपचारिक असते तर बोलीभाषा अनौपचारिक असते. प्रमाणभाषा तांत्रिकतेकडे झुकते तर बोली भाषेला त्या त्या मातीचा गंध असतो. त्यात जिवंतपणा असतो. दोन्हीपैकी कोणती भाषा निवडायची याचा अनुवादकाला गांभीर्याने विचार करावा लागतो. उदा. ग्रामीण कादंबरीचा अनुवाद असेल आणि प्रमाणभाषा वापरली तर त्यातील गंमत निघून जाते. म्हणूनच अनुवादकाला भिन्न भिन्न बोली, त्यांचे सांस्कृतिक, सामाजिक संचित यांचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
प्रश्न 8.
(अ) खालील परिच्छेदाचा हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करा.
मोहन आज सकाळी लवकर जागा झाला. त्याने दात घासले, तोंड, हात-पाय धुतले आणि तो अभ्यासाला बसला. आज तो खेळायला गेला नाही. मोहनने दहा वाजता भोजन केले. लेखनसाहित्य घेतले आणि तो परीक्षेसाठी शाळेत निघून गेला.
उत्तर :
मूळ लेख : मोहन आज सकाळी लवकर जागा झाला. त्याने दात घासले, तोंड, हात-पाय धुतले आणि तो अभ्यासाला बसला. आज तो खेळायला गेला नाही. मोहनने दहा वाजता भोजन केले. लेखन साहित्य घेतले आणि तो परीक्षेसाठी शाळेत निघून गेला. हिंदी : मोहन आज सुबह जल्दी उठा। उसने दाँत साफ किये, हाँथ, पैर, मुँह धोया और वह पढ़ाई करने बैठा। वह ‘आज’ खेलने नहीं गया। दस बजे उसने खाना खाया। लेखन साहित्य लेकर वह परीक्षा देने स्कूल पहुँच गया। इंग्रजी : Mohan woke up early today. Brushed his teeth, had a bath, got ready and sat to study. Due to his exam, he did not go to play today. He had his lunch at 10.00 am. He then took his study material and went to school for the exam.
(आ) खालील वाक्यांचा मराठी व इंग्रजीत अनुवाद करा.
प्रश्न 1.
किसी नदी में एक भेड़िया ऊपर की तरफ पानी पी रहा था।
उत्तर :
मराठी : एका नदीवर एक लांडगा नदीच्या वरच्या बाजूला पाणी पीत होता.
इंग्रजी : Besides a river, on the upper edge a wolf was drinking water.
प्रश्न 2.
मेरे मित्र की चिट्ठी कई दिनों बाद आयी।
उत्तर :
मराठी : खूप दिवसांनी माझ्या मित्राचे पत्र आले.
इंग्रजी : I received my friends letter after so many days.
प्रश्न 3.
राम के पिता मोहन यहाँ आएँ है।
उत्तर :
मराठी : रामचे वडील मोहन इथे आले आहेत.
इंग्रजी : Ram’s father, Mohan came here.
Answer by Dimpee Bora