Chapter 9                             वहिनींचा 'सुसाट' सल्  


1.आ. कारणे लिहा.


प्रश्न 1.

उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण …………

उत्तर :

उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण उषाताईंची वयाची अट्ठावन्न वर्षे पूर्ण होत होती. सरकारी नियमाप्रमाणे अठ्ठावन्न वर्षे वय हे सेवा निवृत्तीचे वय समजले जाते.


प्रश्न 2.

निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ………….

उत्तर :

निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण दोघींच्या वयात पाच वर्षांचे अंतर होते. उषावहिनी या वयाने निशापेक्षा पाच वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांचीच भूमिका त्यांच्याच नावाने करायची होती म्हणून निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला.


प्रश्न 3.

महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ………..

उत्तर :

महिला प्रेक्षकांत अपेक्षाभांगाची एक जोरकस लाट आली, कारण आज त्यांनी उलटाच प्रकार अनुभवला होता. मागील वीस वर्षांमधल्या कार्यक्रमात उषावहिनींच्या साडीवर चर्चा व्हायची आणि अगदी तश्शीच साडी खरेदी करायला बायकांच्या शोधयात्रा निघायच्या. पण आज मात्र अगदी साधी साडी त्यांनी परिधान केली होती ती साडी काठापदराची व मळखाऊ रंगाची होती म्हणून महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट पसरली.


प्रश्न 4.

मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण …………..

उत्तर :

मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते, कारण मुंबईतल्या बहुतेक स्त्रिया नोकरी करतात, त्यामुळे मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाइत होते.


इ. वैशिष्ट्येलिहा.


प्रश्न 1.

दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.

उत्तर :

मुंबईला दूरदर्शन सुरू झालं, त्यानंतर आजतागायत चालू असलेला एकमेव असा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम होता. या कार्यक्रमात उषावहिनी महिलांना संसाराच्या बाबतीत ‘जोडा, जुळवा व जमवून घ्या’ असे सल्ले देत असत. थोडक्यात ‘वहिनींचा सल्ला’ या कार्यक्रमात उषावहिनी महिलांना सबुरीचा सल्ला देत असत. तसेच दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघायला शिका अशा त-हेच्या सूचना त्या महिला प्रेक्षकवर्गाला देत असत.


प्रश्न 2.

शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.

उत्तर :

‘बहिनींचा सल्ला’ हा लोकप्रिय कार्यक्रम होता या कार्यक्रमाने विशी गाठली होती. वयोमानाप्रमाणे निवृत्त व्हावे लागते याच नियमानुसार उपवहिनींना अट्ठावन्न वर्षे पूर्ण होत होती त्यामुळे या कार्यक्रमाला समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार होत्या, तसेच उषावहिनींचा सत्कारही होणार होता. ह्या कार्यक्रमाची शेवटची दहा मिनिटं प्रेक्षकांना वहिनींशी फोनवरून थेट संपर्क साधता येणार होता. हा कार्यक्रम प्रथमच दूरदर्शन केंद्राच्या बाहेर होणार होता. तसेच शेवटचा म्हणूनच खास महत्त्वाचा होता.


2. पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.


प्रश्न 1.

रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.

उत्तर :

मागील वीस वर्षे उषावहिनींचा वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम दूरदर्शनवरून प्रसारित होत होता. उषावहिनींच्या जोडा, जुळवा व जमवून घ्या या सल्ल्यामुळे हा कार्यक्रम त्यावेळी यशाच्या शिखरावर होता पण या सल्ल्याचा उपयोग खरोखरच कोणी संसारात किंवा जीवनात करून घेत का? असा प्रश्न उपस्थित रहात होता. प्रेक्षकवर्ग कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे दाद देत होता. सलग वीस वर्षे कार्यक्रम यशस्वी होत होता. वहिनी सगळ्यांना कार्यक्रमात सबुरीचा सल्ला देत असत पण खरोखरच्या जीवनात त्याचा अवलंब किती होत होता याचे उत्तर अनुत्तरीत होतं म्हणून रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस होता हे स्पष्ट होतं.


प्रश्न 2.

मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.

उत्तर :

संसारामध्ये प्रत्येकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही जणांच्या आयुष्यात संकटांमागुन यातना किंवा दुःख सहन करावे लागते. यातून त्यांना बाहेर काढावे लागते. दुःखातून बाहेर काढण्यासाठी विविध मागांचा अवलंब करावा लागतो. सर्वसामान्य लोकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी अनेक सामाजिक संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र झटत असतात. तसेच कार्य निशावहिनी करत आहेत. त्या कामगार क्षेत्रात काम करतात. समस्यांच्या मुळापर्यंत जातात व त्या समस्येतून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य दुःखातून मुक्त होण्याचा योग्य तो मार्ग दाखवणारी व्यक्ती म्हणजेच खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करणारी व्यक्ती होय, मात्र अगदी साधी साडी त्यांनी परिधान केली होती ती साडी काठापदराची व मळखाऊ रंगाची होती म्हणून महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट पसरली.


प्रश्न 3.

इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!

उत्तर :

मुंबईसारख्या शहरात जर राहायचे असेल तर घरातील पुरुष व स्त्रिया यांनी नोकरी करणे आवश्यक असते नाहीतर खर्च भागवता भागवता नाकी नऊ येतात असा अनेकांचा अनुभव आहे. जर घरातील महिला नोकरी करीत असेल तर मुंबईत जे पाहुणे येतात ते त्यांच्या घरी जात नाहीत कारण त्यांची पंचाईत होते. त्यांची ऊठ-बस किंवा सरबराई करायला यजमानाच्या घरात हक्काची बाई नसते. याचाच अर्थ जर घर व्यवस्थित वॉटरप्रूफ केलं असेल तर पावसात गळायची भीती नसते. त्याचप्रमाणे घरातील महिला जर कामावर जात असेल तर पाहुणेरूपी पावसाची अजिबात भीती नसते.


प्रश्न 4.

‘कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल’

उत्तर :

कोणत्याही समस्येवर जर उपाय शोधायचा असेल तर त्या समस्येचा सखोल अभ्यास करून त्यावर उपाय शोधला पाहिजे तरच ती समस्या कायमची संपुष्टात येईल, ज्याप्रमाणे एखादया झाडाला जर कीड लागली आणि त्याकडे जर दुर्लक्ष केले गेले तर कीड ते झाड पूर्णपणे खाऊन टाकते. त्यामुळे जर कीड मुळापासून औषधमागांनी उपटून काढली तरच झाड जगेल. अन्यथा ते मरेल. त्याचप्रमाणे औषधरूपी सल्ल्याचा उपयोग जर संसारात केला किंवा रोजच्या जगण्यात केला तर त्याच त्याच समस्या पुन्हा उद्भवणार नाहीत व आयुष्य सुखासमाधानाने जगता येईल.


आ. केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्येयांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.


प्रश्न 1.

केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्येयांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.

उत्तर :

1. केवल वाक्ये :

(अ) उषावहिनी पर्स घ्यायला आत गेल्या.

(ब) शिवाजी मंदिरच्या मागच्या पार्किंग स्पेसमध्ये गाडी थांबली.


2. मिन वाक्ये

(अ) जर या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असली तर हे अंजन वापरण्यावाचून तुम्हांला पर्याय नाही.

(ब) म्हणजे महाराष्ट्रात जेवढं जग सामावलेलं आहे त्यातल्या हजारो व्यक्तींना वहिनींनी सल्ले दिले होते.


3. संयुक्त वाक्ये:

(अ) पाहुण्यांचा पाऊस पडायला लागला, की डोक्यावर उलटी छत्री धरायची.

(ब) माझ्या पावसासाठी तुम्हीच रेनकोट पुरवू शकाल, अशी माझी खात्री आहे. कारण माझ्याकडे पाऊस पडतो तो पाहुण्यांचा.


ई. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.


प्रश्न 1.

अ. काजवे चमकणे – ………………….

आ. डोळे लकाकणे – ………………..

इ. कायापालट होणे – ………………..

ई. कडेलोट होणे – …………………..

उत्तर :

अ. काजवे चमकणे- अंधारी येणे किंवा अतिशय घाबरणे.

वाक्य : अचानकपणे दुचाकी घसरून झालेल्या अपघातामुळे माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले.


आ. डोळे लकाकणे – आशेचा किरण दिसणे,

वाक्य : अर्जुनाची भूमिका करणारा अभिनेता मिळाल्यावर दिग्दर्शकाचे डोळे लकाकले.


इ. कायापालट होणे – अनपेक्षित बदल होणे.

वाक्य: बऱ्याच वर्षांनतर गावी गेल्यावर गावचा कायापालट झालेला मला दिसला.


ई. कडेलोट होणे – गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे.

वाक्य : काहीही चूक नसताना पोलिस चौकशीला येत आहेत हे समजल्यावर श्यामची अवस्था कडेलोट झाल्यासारखी झाली.



4. स्वमत


प्रश्न अ.

वहिनींचा सल्ला ‘सुसाट’ वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.

उत्तर :

कथेचा अभ्यास केला असता वहिनींचा सल्ला सुसाट आहे. उघावहिनी निशावहिनी यांच्या सल्ल्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. उषावहिनी या ‘जोडा’, ‘जुळवा’ व ‘जमवून घ्या’ असा सल्ला देत असत. पण निशावहिनींचे सल्ले मात्र अगदी त्यांच्या विरुद्ध असल्याचे जाणवते. भीड, संकोच व परंपरा गुंडाळून ठेवायच्या, पाहुण्यांना येणारा प्रेमाचा पोकळ पुळका ओळखायला शिकायचा. त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या स्त्रीला ‘जोडा, जुळवा व जमवून घ्या’ यांऐवजी ‘असहकार’ पुकारायला सांगणे व त्याच मार्गाने म्हणजे जशास तसे उत्तर देऊन वठणीवर आणायचे असे सल्ले वहिनींनी दिले. एका बाजूला उषावहिनींचा सामोपचाराचा सल्ला व दुसऱ्या बाजूला निशावहिनींचा अगदी त्यांच्या विरोधातला म्हणजे जशास तसे उत्तर देण्याचा सल्ला, कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल असा साधारणपणे समाजाच्या रूढी परंपरेशी विसंगत असा निर्णय घेण्याची हिंमत म्हणूनच वहिनींचा सल्ला आम्हांला ‘सुसाट’ वाटतो.


प्रश्न आ.

‘पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.

उत्तर :

निलंजना बॅनर्जी यांनी पावसाप्रमाणे येणाऱ्या पाहुण्याविषयीच्या समस्येचा प्रश्न विचारला पण तो त्यांनी सांगताना किंवा मांडताना वेगळ्या पद्धतीने मांडला. त्यामुळे येथे विनोदाची निर्मिती झालेली दिसून येते. निलंजना बॅनर्जी या गृहिणी आहेत. त्या एका सेवाभावी संस्थेत घरची जबाबदारी सांभाळून काम करतात. त्यांची कुटुंबियांच्या संदर्भात कोणतीच समस्या नव्हती, त्या गृहिणी असल्यामुळे त्यांच्याकडे सतत पाहुण्यांचा राबता असायचा, पाऊस जसा धो धो कोसळतो व तो अनियमित असतो त्याचप्रमाणे त्यांच्याकडे भरपूर पाहुणे यायचे. हे सांगताना त्यांनी पाहण्यासाठी पावसाची उपमा वापरली. त्यावरून त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात येते म्हणून त्यांनी अशी समस्या मांडली. त्यावर निशा बहिनींनी उत्तर दिले, माझा वॉटरप्रूफिंगशी काहीही संबंध नाही यामुळे प्रश्नाचा अर्थ समजण्यात किंवा समजावण्यात थोडीशी गफलत झालेली दिसून येते. त्यामुळे विनोदाची निर्मिती होते म्हणजेच शब्द फिरवल्यानंतर हलका फुलका विनोद निर्माण होतो. त्यामुळे मला हा विनोद आवडला.


प्रश्न इ.

सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.

उत्तर :

प्रत्येकाला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या असतात त्यावर जर त्यांना उपाय सापडला नाही तर मात्र इतरत्र सल्ले मागितले जातात. कथेमध्ये ज्या काही समस्या मांडल्या आहेत. त्या सर्वसामान्य गृहिणींच्या आहेत. बऱ्याच घरात नवरा व बायको दोघेही नोकरी करतात पण घरातल्या कामात मात्र बराचसा पुरुषवर्ग हात आखडता घेत असतो. त्यामुळे बऱ्याच नोकरदारांच्या घरी घरातल्या कामांसंबंधी समस्या निर्माण होते. दुसरी समस्या म्हणजे मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांची समस्या. शक्यतो ज्या घरातील स्त्री नोकरी करत नाही त्याच घरात पाहुण्यांचा राबता असतो.काही वेळा पाहुण्यांना प्रेमाचा पोकळ पुळका येतो. तसेच घराघरात सासू आणि सुनेची एकत्र नांदण्याची समस्या, अनेक महिलांना पुरुष सहकाऱ्यांचे, हाताखाली काम करणाऱ्या पुरुषांचे कामावर येणारे धक्कादायक अनुभव आहेत, मुलींची रस्त्यावरील छेडाछाड समस्या खरोखरच समाजाला एका वेगळ्याच मार्गावर नेत आहेत. त्यामुळे या सर्व समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत.मुलींची रस्त्यावर होणारी छेडछाड यामुळे तिला बाहेर पडणे कठीण होते. कार्यालयात आलेल्या अनेक वाईट अनुभवांमुळे ती सुरक्षित नसते. दारूच्या व्यसनामुळे संसाराची झालेली वाताहात, दारूच्या आहारी गेलेल्या नवऱ्याबरोबर सतत होणारी भांडणे, त्यांचे कुटुंबावर होणारे परिणाम, खालावलेली आर्थिक परिस्थिती त्यामुळे या समस्या योग्य आहेत. असे माझे मत आहे.


प्रश्न ई.

खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी’ तुमच्या प्रतिक्रिया लिहा.

उत्तर :

उषावहिनी व निशावहिनी दोघीही सारख्या बहिणी होत्या. पण त्या दोघींच्या स्वभावात मात्र खूपच फरक होता. उषावहिनींचा स्वभाव जोडा, जुळवून घ्या असा होता म्हणजेच सबुरीच्या सल्ल्याप्रमाणे होता. पण अगदी त्यांच्या उलट निशावहिनींचा स्वभाव होता. समाजात जीवन जगत असताना सरळ मार्गी जाणाऱ्या माणसाशी सरळ मार्गाने वागावे पण जर तो वाकड्या मार्गाचा अवलंब करीत असेल तर आपणसुद्धा तशाच मार्गाचा अवलंब केला तर मात्र आपण यशस्वी होतो. असे निशाबहिनींच्या स्वभावाचे पैलू होते. त्यामुळे शेवटच्या ‘वहिनींचा सल्ला’ या कार्यक्रमात निशावहिनी यांनी आपला ठसा उमटवला. उषावहिनींनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की “मी लोकांना वर्षानुवर्षे औषध म्हणून साखरेच्या गोळ्या देत आले. तू मात्र आज लोकांना कडू क्विनाईनचा डोस देण्याचं धाडस केलंस.” माझ्या मते दिलेली पसंती ही योग्य आहे कारण सध्याच्या काळात जर असे वागले तरच निभाव लागणे शक्य आहे. मग ती समस्या घरात असो किंवा घराच्या बाहेर असो मुंबईसारख्या शहरात तर असे वागणे हीच काळाची गरज आहे. त्यामुळे निशावहिनींनी महिलांना विविध समस्यांबाबत दिलेला सल्ला मला योग्य वाटतो.


5. अभिव्यक्ती :


प्रश्न अ.

वहिनींचा ‘सुसाट ‘ सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.

उत्तर :

उत्तरासाठी कृती : 3 मधील स्वमत पहा.


प्रश्न आ.

‘स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,’ याविषयीचे तुमचे विचार लिहा.

उत्तर :

सध्याच्या काळात स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात खांदयाला खांदा लावून काम करीत असतात. त्या कुठेही कमी पडत नाहीत. क्तिक पातळीवरसुद्धा स्त्रियांनी आपले अस्तित्व विविध क्षेत्रांत सिद्ध करून दाखवले आहे. अजूनही काही ठिकाणी तिचे अस्तित्व नाकारले जाते किंवा तिने केलेल्या कामाला फारसे महत्त्व दिले जात नाही. पण माझ्या मते स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळायला हवे तसेच प्रत्येक ठिकाणी समान हक्क मिळायला हवा. जर तिने स्वतःला सिद्ध करून दाखवले तर तिचे महत्त्व समाजाला पटेल, खासकरून ज्या ठिकाणी पितृसत्ताक पुरुषप्रधान संस्कृती पद्धत आहे त्या ठिकाणी स्त्रियांचा आत्मसन्मानाचा प्रश्न निर्माण होताना आपणास दिसतो. प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंतच्या विविध दाखल्यांतून आपणास हे समजते. संतांनी स्त्रियांच्या आत्मसन्मानाबद्दल प्रथम वाचा फोडली. संत जनाबाईना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झटावे लागले. पण संत नामदेवांनी तिला ते प्राप्त करून दिले. ‘नामयाची दासी’ म्हणविण्यात जीवनाचे सार्थक मानणाऱ्या संत जनाबाईचे सुमारे 350 अभंग आज उपलब्ध आहेत. सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्यानंतर विविध प्रकारच्या लिखाणातून हे वारंवार सिद्ध झाले आहे. आज अनेक सामाजिक क्षेत्रात, वैयक्तिक क्षेत्रात स्त्रिया मानाच्या पदावर आहेत. भारतासारख्या विशाल देशात तर पंतप्रधानपदी (स्व. इंदिरा गांधी) व राष्ट्रपतीपदी (प्रतिभाताई पाटिल) देखील महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. याचाच अर्थ स्त्रियांनी आपल्या मनातील न्यूनगंडाची भावना जर दूर सारली तर तिला समाजात मानाचे स्थान मिळेल. याचाच अर्थ स्त्रियांनी परंपरेच्या जोखडात न राहता गृहिणींनीसुद्धा आपला आत्मसन्मान जपला पाहिजे तसेच तिच्या घरातील आणि समाजातील लोकांनीसुद्धा तिचा आदर करणे/ जपणे फार महत्त्वाचे आहे.


6. कारणे लिहा.


प्रश्न 1.

सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली, कारण ……

उत्तरः

सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली, कारण सौम्य व्यक्तिमत्त्व आणि समतोल सल्ले देणाऱ्या उषाबहिनींच्या स्वभावात अचानक बदल झाला होता. त्यांचे स्वत:च्या मनाचा कौल घ्या, स्वत:ला स्वत:च महत्त्व दया, आत्मसन्मान जपा, असे भारतीय रूढी-परंपरेला आव्हान देणारे सडेतोड विचार ऐकन सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली.


प्रश्न 2.

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

उत्तर :

1. किंकाळी फोडणे – अतिशय जोराने ओरडणे.

वाक्य : आपल्या मुलाचा आपल्या डोळ्यादेखत झालेला अपघात पाहून त्या मातेने किंकाळी फोडली.


2. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे – खूप प्रयत्न करणे.

वाक्य : छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक मावळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.


3. गैरसमज होणे – चुकीचा समज होणे.

वाक्य : राम हा स्वार्थी आहे असा श्यामचा गैरसमज झाला.


4. आस्वाद घेणे- आनंद घेणे.

वाक्य : बऱ्याच प्रतिक्षेनंतर पडलेल्या पावसात मुलांनी कांदाभजीचा आस्वाद घेतला.


5. आसनाला खिळणे – मग्न होणे.

वाक्य : एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा प्रयोग पाहताना प्रेक्षकवर्ग आसनाला खिळला होता.


6. मान डोलावणे- होकार दाखविणे.

वाक्य : रमेशच्या लग्नाला पालीला जायचे आहे असे कबीरने सांगितल्यानंतर मी मान डोलावली.


7. शब्दसंपत्ती :


प्रश्न 1.

खालील वाक्यांचा अभ्यास करा. ‘कर’ या शब्दाची योग्य अर्थच्छटा कंसातील पर्यायातून निवडा. ती वाक्यांसमोर कंसांत लिहा.

टॅक्स. कृत्य, हात करणे (क्रयापद)

उत्तर :

अ. दाम करी काम वेड्या – (करणे) (क्रियापद)

आ. कर भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे – (टॅक्स)

इ. कर हा करी धरिला शुभांगी – हात

ई. कर नाही त्याला डर कशाला ? – कृत्या


8. ‘वहिनींचा सल्ला’ या कार्यक्रमाची शिवाजी मंदिरातील वर्षसंख्या व उषावहिनींचे त्यावेळेचे वय.


प्रश्न 1.

1. वर्षसंख्या – [ ]

2. उषावहिनींचे त्यावेळेचे वय – [ ]

उत्तर :

1. वर्षसंख्या – 20

2. उषावहिनींचे त्यावेळेचे वय – 58


9. चौकट पूर्ण करा.


प्रश्न 1.

उषावहिनींच्या शेवटच्या कार्यक्रमाचे वैशिष्टय – [ ]

उत्तर :

उषावहिर्नीच्या शेवटच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य – हा कार्यक्रम स्टुडिओमधून काढून शिवाजी मंदिरमध्ये ठेवला होता. त्यासाठी समाजातल्या मान्यवर व्यक्ती निमंत्रित केल्या होत्या. उघावहिनींचा सत्कार होणार होता.


प्रश्न 2.

मागील वीस वर्षांत उषावहिनींनी कार्यक्रमादरम्यान सुखी संसारासाठी वापरलेली आयुधे.

1. ……… 2. ……… 3. ……… 4. ………

उत्तर :

1. हंडाभर फेविकॉल.

2. दोन-चार मैल लांबीच्या चिकटपटट्या.

3. शंभर एक किलो डिंक.

4. पाच सात बरण्या च्युइंग गम


प्रश्न 3.

‘आला प्रॉब्लेम समोर की, लाव त्याला चिकटपट्टा

परिणाम – …………….

उत्तर:

कृती – ‘आला प्रॉब्लेम समोर की, लाव त्याला चिकटपट्टी

परिणाम – कार्यक्रम यशस्वी


प्रश्न 10.

घटनाक्रम योग्य क्रमानुसार लावा.

समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती आज निमंत्रित होत्या.

उषावहिनींनी एकशेबावन्नाव्यांदा आरशात पाहिलं.

उषावहिनींनी एकशेचौपन्नाव्यांदा घड्याळात पाहिलं.

चार पावलं भराभरा मागे जाऊन, चार पावलं भराभरा पुढे येऊन स्वतःला पाहिलं.

उत्तर :

उषावहिनींनी एकशेबावन्नाव्यांदा आरशात पाहिलं.

चार पावलं भराभरा मागे जाऊन, चार पावलं भराभरा पढे येऊन स्वत:ला पाहिलं.

समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती आज निमंत्रित होत्या.

उषावहिनींनी एकशेचौपन्नाव्यांदा घड्याळात पाहिलं.


प्रश्न 11.

योग्य विरामचिन्हांचा पर्याय ओळखा.

वहिनींच्या सल्ल्याचा शेवटचा कार्यक्रम.

पर्याय :

(अ) एकेरी अवतरणचिन्ह, पूर्णविराम

(ब) स्वल्पविराम, पूर्णविराम

(क) स्वल्पविराम, उदगारवाचक चिन्ह

(ड) पूर्णविराम, अपसारण चिन्ह.

उत्तर :

एकेरी अवतरणचिन्ह, पूर्णविराम, विरामचिन्हे घालून वाक्य – ‘वहिनींच्या सल्ल्या’चा शेवटचा कार्यक्रम.