Chapter 16                                  सूत्रसंचालन    


1. सूत्रसंचालकाने कोणत्या भाषांतील अवतरणे संग्रहित करावीत?

 मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू.


2. वाचनाचे दोन प्रकार कोणते सांगितले आहेत?

 सातत्याने करायचे वाचन आणि कार्यक्रमानुसार करायचे वाचन.


3. वाचनाबरोबर काय सुरू असते?

 चिंतन.


4. सूत्रसंचालकाने टिपून ठेवलेल्या सूचनांचा उपयोग कधी होतो?

 योग्य ठिकाणी निवेदनात वापरताना.


5. सूत्रसंचालन पुस्तकी होऊ नये यासाठी काय करावे?

 स्वतःचे चिंतन आणि टिपण्णीचा वापर करावा.


6. श्रवण आणि निरीक्षणातून सूत्रसंचालक काय शिकू शकतो?

 देहबोली, शब्दफेक, सहजता, संवादकौशल्य इत्यादी.


7.सूत्रसंचालकाने कोणते कार्यक्रम चिकित्सकपणे पाहावेत?

 व्याख्याने, मुलाखती आणि सूत्रसंचालनाचे कार्यक्रम.


8. दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवरील कार्यक्रम पाहण्याचा लाभ काय?

 चांगल्या वाईट गोष्टींचा अभ्यास करता येतो.


9. YouTube वर उपलब्ध कार्यक्रमांचा उपयोग कसा होतो?

 वारंवार ऐकून स्वतःची निवेदनशैली घडवता येते.


10. सूत्रसंचालकाचा अभ्यास कोणत्या माध्यमातून पोहोचतो?

 आवाजाच्या माध्यमातून.


11. आवाजाची जोपासना करण्यासाठी कोणत्या प्रकाराचे वाचन करावे?

 प्रकट वाचन, कविता वाचन, पठण.


12. उच्चारशुद्धता आणि आरोह-अवरोह कोणत्या सरावाने सुधारतात?

 अभिवाचन आणि पाठांतरातून.


13. आवाजाची गती आणि लय कोणावर अवलंबून असते?

 श्वासावर.


14. योग आणि प्राणायाम सूत्रसंचालकाला कसे उपयुक्त आहेत?

 श्वास नियंत्रण आणि आवाज स्थिर ठेवण्यासाठी.


15. आवाज विकसनाचे शास्त्र काय सांगते?

 आवाज कसा घडवावा आणि जपावा.


16. ध्वनिवर्धकाचा वापर कशावर अवलंबून असतो?

 कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आवाजाची पातळी आणि अंतरावर.


17. खुले व्यासपीठ आणि बंदिस्त सभागृहात काय बदलतो?

 आवाजाचे स्वरूप.


18. असा सराव झाल्याने सूत्रसंचालकात काय निर्माण होते?

 आत्मविश्वास.


19. सूत्रसंचालनापूर्वी कार्यक्रमाबद्दल कोणती माहिती घ्यावी?

 विषय, स्थळ, तारीख, वेळ, अध्यक्ष, अतिथी, श्रोते.


20. कार्यक्रमपत्रिका का समजून घ्यावी?

 कार्यक्रमाच्या क्रमाची कल्पना यावी म्हणून.


21. कार्यक्रमाचे स्थळ नवीन असल्यास काय करावे?

 तेथील जागा प्रत्यक्ष पाहावी.


22. श्रोतृवर्गाच्या कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात?

 वयोगट, अभिरुची, स्तर.


23. संदर्भ मिळवण्यासाठी काय करावे?

 विषयानुसार वाचन करावे.


24. निवेदनाची संहिता कशी तयार करावी?

संदर्भ, सुवचने आणि काव्यपंक्ती समाविष्ट करून.


25. अतिरिक्त अवतरणांचा वापर का टाळावा?

 कारण अतिरेकामुळे प्रभाव कमी होतो.


26. संहितेत नावीन्य का असावे?

 श्रोत्यांचे लक्ष वेधण्यासाठी.


27. कार्यक्रमातील संभाव्य अडचणींचा अंदाज का घ्यावा?

 तणाव टाळण्यासाठी आणि तत्परतेने हाताळण्यासाठी.


28. सूत्रसंचालकासाठी सर्वात महत्त्वाचे गमक कोणते?

 आत्मविश्वास.


29. सूत्रसंचालकाने इतरांच्या चुकांमधून काय शिकावे?

स्वतःच्या त्रुटी सुधाराव्या.


30. वाचन, श्रवण आणि सराव यांचा परिणाम काय होतो?

उत्कृष्ट सूत्रसंचालन घडते.

  

Answer by Dimpee Bora